• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“भक्ती, सेवा आणि भव्यतेचा संगम घडवणारे मा. प्रकाशभाऊ धारिवाल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!”

by
March 6, 2026
in Blog
0
0
SHARES
412
VIEWS
Ad 1

शिरूरच्या पावन भूमीत भक्तीचा विश्वविख्यात सोहळामा. प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या संकल्पातून साकारला भव्य-दिव्य श्री शिवमहापुराण कथा सोहळा…

प्रभू श्री रामलिंग महाराज यांच्या पवित्र आणि पुण्यभूमीत घडलेला श्री शिवमहापुराण कथा सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर शिरूर नगरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिकतेचा अद्वितीय सोहळा ठरला. या जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरलेल्या कार्यक्रमामागे ज्या व्यक्तिमत्त्वाचा दृढ संकल्प, समाजाप्रती असलेली नितांत आस्था आणि शिवभक्तीची अखंड भावना उभी आहे ते म्हणजे शिरूरचे सुपुत्र, जगप्रसिद्ध उद्योगपती आणि समाजहित चिंतक “मा. प्रकाशभाऊ धारिवाल.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

शिरूर शहर आणि पंचक्रोशीशी मा. प्रकाशभाऊ धारिवाल यांचे एक वेगळे, जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते आहे. समाजासाठी काहीतरी भव्य, पवित्र आणि कायम स्मरणात राहील असे कार्य घडवण्याचा त्यांचा संकल्प या शिवमहापुराण कथासोहळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरला. त्यांच्या एका हाकेला प्रतिसाद देत शिरूर शहरासह पंचक्रोशीतील हजारो स्वयंसेवक, सामाजिक संस्था, धर्मप्रेमी नागरिक आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी झाले. त्यामुळे हा कार्यक्रम एखाद्या संस्थेचा न राहता संपूर्ण शिरूरकरांचा सामूहिक भक्तीउत्सव बनला.
प्रभू श्री रामलिंग महाराज यांच्या पावन भूमीत प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात शिवमहापुराण कथासोहळ्याचे आयोजन झाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सीहोर वाले) यांच्या अमृतमय वाणीतून शिवतत्त्व, श्रद्धा, विश्वास, समर्पण आणि सदाचार यांचा प्रभावी संदेश लाखो भाविकांच्या मनामनांत पोहोचला.

“एक लोटा जल सारी समस्या का हल” हा साधा पण जीवनाला दिशा देणारा संदेश त्यांनी आपल्या प्रवचनातून दिला. सुमारे २५ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य धर्मसभामंडपात दररोज लाखो शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवमहापुराण कथा श्रवणाचा लाभ घेतला. “हर हर महादेव”, “श्री शिवाय नमस्तुभ्यं” आणि “प्रभू श्री रामलिंग महाराज की जय” अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उत्कृष्ट नियोजन. लाखो भाविकांची व्यवस्था, वाहतूक, स्वयंसेवकांचे समन्वय, स्वच्छता, निवास आणि भोजन यासह प्रत्येक बाब अत्यंत शिस्तबद्ध आणि सुयोग्य पद्धतीने पार पडली. अनेक भाविकांनी कौतुकाने नमूद केले की, असा भव्य आणि सुव्यवस्थित धार्मिक सोहळा त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता.

जगप्रसिद्ध उद्योगपती… पण मनाने अत्यंत साधे आणि प्रेमळ
मा. प्रकाशभाऊ धारिवाल हे जगप्रसिद्ध उद्योगपती असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, प्रेमळपणा आणि लोकांशी असलेला आत्मीय संवाद हा या कथासोहळ्यात विशेषत्वाने दिसून आला. लाखो शिवभक्तांमध्ये वावरताना त्यांनी कोणताही मोठेपणा न दाखवता अत्यंत नम्रतेने प्रत्येकाशी संवाद साधला. अनेक शिवभक्त स्वतः भावनिक होऊन सांगत होते की,
“आम्ही अनेक ठिकाणी शिवमहापुराण कथा अनुभवली आहे, पण शिरूरमध्ये झालेला हा सोहळा आणि येथे मिळालेला सन्मान, प्रेम व व्यवस्था अतुलनीय आहे.”


विशेष म्हणजे मा. प्रकाशभाऊ धारिवाल हे स्वतः दररोज महाप्रसाद स्थळी येऊन शिवभक्तांशी संवाद साधत, त्यांची विचारपूस करत आणि अनेकदा स्वतः भक्तांसोबत बसून महाप्रसाद ग्रहण करत होते. सातही दिवस त्यांनी शिवभक्तांमध्ये राहून सेवा करण्याचा आदर्श घालून दिला. त्यामुळे उपस्थित लाखो भाविकांच्या मनात त्यांच्या विषयी आदर आणि प्रेम अधिकच वाढले.

‘माता कमला की रसोई’ — अन्नदानातून प्रकटलेली मातृमाया…

श्री शिवमहापुराण कथेसाठी राज्यभरातून आलेल्या हजारो शिवभक्तांसाठी पी. आर. धारिवाल फाउंडेशन च्या माध्यमातून उभारण्यात आलेले ‘माता कमला की रसोई’ हे प्रसादालय सेवा, प्रेम आणि अन्नदानाचा अद्वितीय आदर्श ठरले.

भव्य आणि हवेशीर अशा या प्रसादालयात एकावेळी सुमारे तीन हजार भाविक बसून भोजन करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी चहा आणि दुपारी तसेच संध्याकाळी दोन वेळचे स्वादिष्ट भोजन अशी व्यवस्था करण्यात आली होती. फुलके किंवा चपाती, दोन भाज्या, वरण-भात आणि गोड पदार्थांसह पंचपक्वान्नांचा प्रेमाने वाढलेला घास भक्तांसाठी प्रसाद ठरला. कधी जिलेबी, कधी बुंदी, कधी बालुशाही तर कधी बर्फी अशा गोड पदार्थांनी प्रसाद अधिकच मधुर झाला. सात दिवस चाललेल्या या अन्नदान यज्ञातून लाखो शिवभक्तांनी भोजनाचा लाभ घेतला.

या सेवेची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी स्वतः प्रसादालयाला भेट देऊन शिवभक्तांना भोजन वाढण्याची सेवा केली. तो क्षण उपस्थितांसाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला.

शिरूरचा नावलौकिक देश-विदेशात
या भव्य शिवमहापुराण कथासोहळ्यामुळे शिरूर नगरीचा नावलौकिक राज्यभरच नव्हे तर देशभर आणि जगभर पोहोचला. लाखो शिवभक्तांनी अनुभवलेली भक्ती, सेवा आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे हा सोहळा अनेकांच्या मनात कायमचा कोरला गेला. या कथासोहळ्यामुळे शिरूर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिकतेचे अनोखे वातावरण निर्माण झाले. शिवभक्तांच्या मनात सदाचार, संयम आणि सकारात्मकतेची भावना जागृत झाली. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ धार्मिक सोहळा न ठरता समाजप्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ ठरला.

वाढदिवसानिमित्त विशेष शिवमहापुराण प्रेरित कविता – मा. प्रकाशभाऊ धारिवाल

रामलिंगाच्या पावन भूमीत, शिवकथेचा झाला जयघोष
भक्तीच्या त्या महासागरात, हरपला जनतेचा प्रत्येक श्वास

शिवनामाचा गजर घुमला, दुमदुमली धरती-आभाळ
प्रकाशभाऊंच्या संकल्पातून, घडला भक्तीचा महाकाळ

दान-धर्म आणि सेवाभाव, ज्यांच्या कृतीत सदैव जागा
त्यांच्या कार्यामुळे उजळली, शिरूरची भाग्यरेखा

शिवमहापुराणाचा दिव्य प्रकाश, लाखो अंतरी पेटला
प्रकाशभाऊंच्या पुण्यकर्माने, शिरूरचा मान ़वाढला

मा. प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता…

शिवनामाचा जप अखंड, शिवकथेचा दिव्य प्रकाश
प्रकाशभाऊंच्या संकल्पातून, उजळला समाजाचा विश्वास

रामलिंगाच्या चरणी ठेवून, सेवा केली निस्वार्थ भावे
महादेवाची कृपा राहो, त्यांच्या प्रत्येक कार्यावर सदैव

वाढदिवस हा निमित्त ठरो, नव्या संकल्पांच्या आरंभी
प्रकाशभाऊ धारिवाल यांची कीर्ती वाढो, महादेवाच्या कृपाछत्री.

आदरणीय मा. प्रकाशभाऊ धारिवाल,
आपण पी. आर. धारिवाल फाउंडेशन च्या माध्यमातून प्रभू श्री रामलिंग महाराज यांच्या पावन भूमीत श्री शिवमहापुराण कथासोहळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करून लाखो शिवभक्तांच्या मनामनांत भक्तीभावाचा प्रकाश पाडण्याचे महान पुण्यकर्म केले आहे.

आपल्या या पवित्र उपक्रमामुळे शिरूर नगरीचे नाव राज्यभरच नव्हे तर देशभर आणि जगभर अभिमानाने उच्चारले जाऊ लागले आहे. धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम घडवून आपण समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

आपणांस वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन व मंगलमय शुभेच्छा..!
🌹💐🎂🎂🎂💐🌹
शुभेच्छुक :-
अविनाश सुरेश घोगरे
आपला- हक्काचा जनसेवक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिरुर-हवेली, लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके मित्र मंडळ, नगरसेवक अभिजितकाका पाचर्णे मित्र मंडळ, शिरुर

Previous Post

संकष्ट चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती.

Next Post

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

अंजनगाव जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती सोहळा उत्साहात; लेझीम पथकातील विद्यार्थ्यांचा गौरव..

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In