• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दापोलीत आरोग्य सेविकेवर हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास आरोग्य विभागाचा कामबंद आंदोलनाचा इशारा

by
March 8, 2026
in क्राईम
0
दापोलीत आरोग्य सेविकेवर हल्ला; आरोपींना अटक न झाल्यास आरोग्य विभागाचा कामबंद आंदोलनाचा इशारा
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

दापोली, ता. ७ (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई येथील आरोग्यसेविका जयश्री अनिल पांढरे यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करत दापोली तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.परस्पर विरोधी तक्रार दाखल.

RelatedPosts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करत पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांना निवेदन देण्यात आले. आरोपींवर कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ही घटना दि. ६ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास दापोली येथील न्यायालयासमोर असलेल्या सतीमाता मंदिराजवळ घडली.दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संख्या कोळेकर यांच्या थार वाहनाच्या मागील कोपऱ्याला जयश्री पांढरे यांच्या दुचाकीचा हलका स्पर्श झाल्याने या प्रकरणावरून वाद निर्माण झाला.

त्याबाबत चर्चा करण्यासाठी पांढरे दाम्पत्य कोळेकर यांना भेटण्यासाठी गेले असता वाद वाढून भांडण झाले.त्यानंतर पांढरे दाम्पत्य तक्रार नोंदवण्यासाठी दुचाकीने दापोली पोलीस ठाण्याकडे येत असताना त्यांच्या मागून बुलेटवरून संख्या कोळेकर व त्यांचे पती ओमकार कोळेकर आले. न्यायालयासमोरील सतीमाता मंदिराजवळ त्यांनी पांढरे यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने दोघेही खाली पडले. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची तक्रार जयश्री पांढरे यांनी पोलिसांत दिली आहे.

तक्रारीनुसार, संख्या कोळेकर, ओमकार कोळेकर तसेच अन्य दोन जणांनी पांढरे दाम्पत्याला मारहाण केली. तसेच काळ्या रंगाचा चाकू जयश्री पांढरे यांच्या मानेवर लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) व ११८(१) अन्वये चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.दरम्यान, या प्रकरणात संख्या कोळेकर यांनीही जयश्री पांढरे, त्यांचे पती अनिल पांढरे आणि त्यांच्या भावाविरोधात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पांढरे कुटुंबीयांनी जिममध्ये येऊन शिवीगाळ केली तसेच दुचाकी आडवी लावून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीनुसार पांढरे दाम्पत्य व त्यांच्या नातेवाइकाविरोधातही संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान, आरोग्य सेविकेवर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दापोली तालुक्यातील आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने दापोली पोलीस ठाण्यात एकत्र जमले. आरोग्य सेविकेवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

जागतिक महिला दिन जि प प्रा शाळा शिंदेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध स्पर्धा व सत्कार समारंभ

Next Post

“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान”चा कणकवलीत शुभारंभ

Related Posts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
18
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
103
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
15
क्राईम

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

July 12, 2026
198
Next Post
“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान”चा कणकवलीत शुभारंभ

"छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान"चा कणकवलीत शुभारंभ

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In