• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिल्ली-मुंबईनंतर ठाण्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बस

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

ठाणे / प्रतिनिधी: मुंबई-दिल्लीनंतर ठाण्याच्या रस्त्यावर दहा इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार असून त्याचबरोबर आणखी शंभर बस देखिल दिवाळीत ठाणेकर प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांचे आरामदायी प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने कात टाकली असून प्रवाशांना जास्तीत जास्त जलद सेवा देण्यासाठी परिवहन प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. केंद्र सरकारच्या मदतीने ठाणे महापालिका दिवाळीपूर्वी दहा डबल डेकर आणि शंभर साध्या इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. त्याची निविदा देखिल प्रसिद्ध करण्यात आली असून सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर या बस खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे ४५० बस होणार आहेत.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

दिल्ली आणि मुंबई येथे इलेक्ट्रिक डबल डेकर बस प्रवाशांना सेवा देत आहेत, परंतु ठाण्यात मात्र डबल डेकर बस धावली नाही. दिवाळीत ठाण्याच्या रस्त्यावर या बस धावण्याची शक्यता असून त्यामुळे प्रवाशांना देखिल जलद सेवा मिळणार आहे. त्याचबरोबर डबल डेकर बसचा आनंद देखिल घेता येणार आहे.

सध्या परिवहनच्या ताफ्यात कमी बस असल्याने प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहावी लागत आहे. स्टेशन, लोकमान्य, वृंदावन, घोडबंदर, वागळे या भागात बसची सेवा अपुरी पडत असल्याने प्रवासी खाजगी बसचा वापर करतात. ठाणे परिवहन सेवेकडे जास्त बस आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रवासी टीएमटीकडे वळतील, असा विश्वास परिवहन सेवेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

ठाणे परिवहन सेवेकरिता दहा डबल डेकर आणि १०० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी परिवहन विभागाने निविदा काढली असून महासभेच्या मंजुरीनंतर या बस खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन दिवाळीपर्यंत काही बस ठाणे परिवहनच्या ताफ्यात येतील, असा विश्वास ठाणे परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी व्यक्त केला.

Previous Post

सौ. माया सुरासे यांची कन्नड पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड​

Next Post

भिंगार नाला ते जामखेड नाका रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा; कॅन्टोन्मेंटकडे निवेदन

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
25
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
99
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post

भिंगार नाला ते जामखेड नाका रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा; कॅन्टोन्मेंटकडे निवेदन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In