• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कसारा रेल्वे स्थानकात वैद्यकीय सेवेचे वावडे….परंतु माणुसकी च्या मदती मधून रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती…गोंडस बाळाचा जन्म

by
March 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
कसारा रेल्वे स्थानकात वैद्यकीय सेवेचे वावडे….परंतु माणुसकी च्या मदती मधून रेल्वे स्थानकातच महिलेची प्रसूती…गोंडस बाळाचा जन्म
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कसारा : मध्य रेल्वेचे शेवटचे उपनगरीय रेल्वे स्थानक म्हणजेच कसारा स्थानक आहे.आज कसारा स्थानकात चक्क रेल्वे प्लॅटफॉर्म वर एका महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कसारा स्थानकात अगदीच माणुसकीचा प्रत्यय यावेळी पाहायला मिळाला आहे. मुंबई मधून बिहार ला जाणारे नागेंद्र कुमार यांची पत्नी ममता कुमारी यांना रेल्वे प्रवासा दरम्यान प्रसूती कळा सुरु झाल्या. दरम्यान कसारा स्थानकात सदर एक्सप्रेस ही इंजिन जोडण्या साठी थांबणार होती.

दरम्यान एक्सप्रेस ट्रेन कसारा स्थानकात पोहोचताच काही सज्जन नागरिकांनी तत्परतेने पुढाकार घेतला. काळूबाई चंद्रकांत लहाने आणि सरला खंडू भानगीर यांनी तातडीने धाडस दाखवत प्रसूतीसाठी मदत केली. याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथील शुक्ला मॅडम यांनी कर्तव्यदक्ष नर्स सिस्टर सोनाली सांगळे यांना ही माहिती दिली.

माहिती मिळताच सोनालीताई तात्काळ कसारा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या. रेल्वे स्टेशनवर कोणतेही वैद्यकीय इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नसताना देखील त्यांनी अत्यंत धैर्य आणि कौशल्याने प्रसूतीची पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित राहिले.

यानंतर ॲम्ब्युलन्स चालक सतीश खरे, शोभा सोनवणे, जी.आर.पी.एफ. पोलिस शिपाई विष्णू सुपेकर, तसेच सरपंच प्रकाश वीर यांनी तातडीने मदत करत महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथे सुरक्षित पोहोचवून दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या संपूर्ण मोहिमेत ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर रोहित उबाळे आणि RPF वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन मोरे यांनीही अत्यंत दक्षतेने आपले कर्तव्य पार पाडत माणुसकीचा धर्म जपला.

कसारा रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना म्हणजे संकटाच्या क्षणी अनेकांनी एकत्र येऊन केलेल्या मदतीची प्रेरणादायी कहाणी आहे. या सर्वांच्या धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीमुळे एका नव्या जीवाचा सुरक्षित जन्म — आणि पुन्हा एकदा सिद्ध झाले की माणुसकीच सर्वात मोठा धर्म आहे.

सदर घटने बद्दल नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसून येत होतें. अनेकांनी मदती साठी धावून आलेल्या नागरिकांचे आणि रेल्वे कर्मचारी तसेच नर्स सोनाली ताईचे आभार मानले आहेत तर काहींनी रेल्वे स्थानकात बेसिक वैद्यकीय सेवा आणि कर्मचारी तत्पर तेने उपलब्ध असावेत असं म्हटलं आहे.

कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन चे माजी अध्यक्ष आणि सल्लगार शैलेश राऊत यांनी कसारा रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधा असणारी वैद्यकीय रूम आणि त्यासाठी चा कर्मचारी यांची नितांत गरज असल्याचे म्हटलं आहे. रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तत्सम पत्र व्यवहार करून योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत असं शैलेश राऊत यांनी म्हटलं आहे.

Previous Post

‘सनगर समाज ‘ बांधवांचा भव्य मेळावा…

Next Post

परभणीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे १६ व १७ मार्चला आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
99
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
189
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
परभणीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे १६ व १७ मार्चला आयोजन

परभणीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे १६ व १७ मार्चला आयोजन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In