• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; एकाच वेळी चार महिलांना श्वानदंश, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

by
March 17, 2026
in सुरक्षा
0
आडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; एकाच वेळी चार महिलांना श्वानदंश, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
325
VIEWS
Ad 1

दापोली, दि. १४ (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आडे गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करत एकाच वेळी चार महिलांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आडे गावात काही दिवसांपासून एक कुत्रा पिसाळलेल्या अवस्थेत फिरत होता. त्याने अचानक चार महिलांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. जखमी महिलांमध्ये कुसुम दीपक कालेकर, देवकी दामोदर झेंडेकर, भारती हशा कालेकर आणि अलका पालेकर यांचा समावेश आहे.

RelatedPosts

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

जखमी महिलांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, आडे व उटंबर परिसरात कुत्रे व माकडांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

प्राणी संरक्षणाचे नियम लक्षात घेता अशा परिस्थितीत नेमकी काय कारवाई करावी, याबाबतही ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

आडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; एकाच वेळी चार महिलांना श्वानदंश, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

चाळीसगाव-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाला मिळणार गती

Next Post

गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर लालबागेत इतिहासाचे दर्शन – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३६४ समुद्री कवड्यांची पवित्र माळ शिवभक्तांसाठी प्रदर्शित.”

Related Posts

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
ताज्या घडामोडी

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

April 19, 2026
5
साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त
सामाजिक

साई नगर जिल्हा परिषद शाळेजवळ साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका; नागरिक त्रस्त

April 15, 2026
17
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
52
आरोग्य

विदेशी झाडे काढून देशी झाडे लावा

January 1, 2025
12
Next Post

गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर लालबागेत इतिहासाचे दर्शन – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३६४ समुद्री कवड्यांची पवित्र माळ शिवभक्तांसाठी प्रदर्शित.”

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In