• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा १७० वा प्रकट दिवस; मिरजेतील पूर्व म्हाडा कॉलोनी येथील मंदिरामध्ये प्रकट दिनानिमित्त लगबग सुरु   

by
March 19, 2026
in महाराष्ट्र
0
उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा १७० वा प्रकट दिवस; मिरजेतील पूर्व म्हाडा कॉलोनी येथील मंदिरामध्ये प्रकट दिनानिमित्त लगबग सुरु   
0
SHARES
35
VIEWS

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

Ad 1

निःशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पळपाठीशी नित्य आहे रे मना.. ये उद्गार कानावर पडल्यावर आपोआप श्री स्वामी समर्थ महाराजांची आत्मविश्वास निर्माण करणारी मूर्ती आपल्या नजरेसमोर  उभी राहते. उद्या स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला प्रथेप्रमाणे अनंतकोटी ब्रह्मांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिवस महाराष्ट्रासह देश विदेशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. उद्या दि २० मार्च रोजी श्री स्वामींचा १७० वा प्रकट दिन सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मिरज मधील प्रभाग तीन मध्ये असणाऱ्या महापालिकेच्या भूखंडावर गेल्या २० वर्षांपूर्वी श्री स्वामी भक्तांनी भक्तिभावातून या एक भव्य मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आणि तो बघता बघता पूर्णत्वास आला. आज या मंदिरामध्ये दैनंदिन श्री स्वामींची नित्य काकड आरती सह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. उद्या दि २० रोजी महाराजांचा प्रकट दिवस सालाबाद प्रमाणे साजरा होत आहे यासंदर्भात या मंदिरातील जेष्ठ सेवेकरी तथा पुजारी आणि मार्गदर्शक स्वामी भक्त रवींद्र कबाडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता ते म्हणाले,’उद्या होणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १७० व्या प्रकटदिनाच्या सोहळ्यासाठी हजारो भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही योग्य पद्धतीने सर्व भक्तमंडळी नियोजन करत आहोत. उद्या सकाळी नित्यनियमाने ९.१५ मिनिटांनी श्रींची आरती होईल यावेळी सांगली गणपती संस्थानचे युवराज आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन हे यंदा या आरतीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या मंदिराला श्री गणपती पंचायतन संस्थानचे मुख्य व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी त्यांच्या सहकार्यांसह हजेरी लावून श्रींचे दर्शन घेतले होते त्यावेळी उद्या होणाऱ्या प्रकट दिनी युवराजांसह आम्ही सर्व मिळून येऊ असे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे ते उद्या येतील त्याच प्रमाणे सालाबाद प्रमाणे श्रींचा पालखी सोहळा सवाद्य ठरलेल्या वेळेनुसार सुरु होईल आणि साधारण दुपारी १२ च्या दरम्यान मंदिरामध्ये संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. महाप्रसादानंतर भजन कीर्तन अशी धार्मिक आणि सात्विक स्वरूपाचे कार्यक्रम मंदिरातील भक्तमंडळींकडून आयोजित केली जातील आणि सायंकाळी आरतीने प्रकटदिनाचा समारोप होईल. मिरज तालुक्यामध्ये हे मंदिर एकमेव असल्याने रोज या मंदिरामध्ये शेकडो भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. हे मंदिर महापालिकेच्या जागेवर असल्याने प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी योग्य सहकार्य केले आहे. तसेच येथील स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी सुद्धा या मंदिराची देखभाल वेळोवेळी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.                     

Previous Post

बटकणंगले येथील नवीन बस थांबा प्रवाशांच्या सोयीचा; ग्रामपंचायतीचे एसटी प्रशासनाला पत्र

Next Post

📚 “पुस्तकांची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत; चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलचा प्रेरणादायी उपक्रम”

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
📚 “पुस्तकांची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत; चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलचा प्रेरणादायी उपक्रम”

📚 “पुस्तकांची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत; चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूलचा प्रेरणादायी उपक्रम”

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In