• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीची नवी कार्यकारिणी जाहीर; उदगीर येथे ग्राहक हक्क दिन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

उदगीर प्रतिनिधी 🖊️

ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य तसेच ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक हक्क दिनाचा कार्यक्रम उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन. जी. यमेकर (उपप्राचार्य), डॉ. एस. डी. लोहारे, डॉ. ए. आर. कवठाळे, प्रा. मनोहर भालके, दत्ता बिरादार, राम राठोड उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक म्हणून संस्थापक राज्याध्यक्ष तानाजीराव नरहरीराव गुंड, प्रदेश कार्याध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे, बी. जी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. मराठवाडा अध्यक्ष तथा राज्य संघटक पदावर बी. जी. शिंदे (अतनूरकर) यांची निवड करण्यात आली. त्यांना प्राचार्य काळगापुरे, राज्याध्यक्ष तानाजी गुंड आणि कार्याध्यक्ष सतीशकुमार बुरगुटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

तसेच उदगीर तालुका अध्यक्षपदी प्राचार्य व्यंकटराव कणसे, कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. अविनाश प्रभातराव पाटील, उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. सुनील यशवंतराव ढगे यांची निवड करण्यात आली. इतर पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली असून विविध स्तरांवर संघटना मजबूत करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, युवक-युवती, ग्राहक स्वयंसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांमध्ये जनजागृती करणे, सदोष वस्तू व सेवांविरुद्ध आवाज उठवणे, सायबर फसवणुकीपासून संरक्षण देणे आणि तक्रार निवारण मंचाद्वारे ग्राहकांना न्याय मिळवून देणे हे आहे. नव्याने जाहीर झालेली कार्यकारिणी ग्राहकांच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Tags: Kamlakar mule
Previous Post

रमजान ईद हा आनंद, प्रेम व एकोप्याचा सण – आ. संजय बनसोडे

Next Post

सर्वसामान्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा – जि.प. सदस्य रामभाऊ तिरुके यांचे आवाहन

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
12
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
21
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post
सर्वसामान्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा – जि.प. सदस्य रामभाऊ तिरुके यांचे आवाहन

सर्वसामान्यांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळावा – जि.प. सदस्य रामभाऊ तिरुके यांचे आवाहन

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In