• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुंडलवाडी पोलिसांकडून पोस्को प्रकरणात ३६ तासात दोषारोपपत्र सादर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in क्राईम
0
कुंडलवाडी पोलिसांकडून पोस्को प्रकरणात ३६ तासात दोषारोपपत्र सादर
0
SHARES
81
VIEWS
Ad 1

◆आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

कुंडलवाडी (सिध्दार्थ कांबळे)

RelatedPosts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांत तत्परतेने कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला कुंडलवाडी पोलिसांनी अक्षरशः सार्थ ठरवले आहे. एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर, केवळ ३६ तासांत तपास पूर्ण करून कुंडलवाडी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जून २०२५ पासून कॉलेजला ये-जा करत असताना,तिच्या मैत्रिणीचा भाऊ तिला व तिच्या मैत्रिणीला सोडण्यासाठी दुचाकीवर येत असे.यावेळी आरोपीने पीडितेशी जवळीकता साधून तिचा विनयभंग केला व तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी दबाव टाकला. पीडितेने नकार दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीने २१ मार्च २०२६ च्या मध्यरात्री पीडितेच्या घरी जाऊन तिला व तिच्या आई-वडिलांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.पीडितेने कुंडलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या ‘मिशन निर्भया’ मोहिमेअंतर्गत तातडीने सूत्रे हलवण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर शिंदे,व्यंकट घोंगडे,रघुवीरसिंह चौहाण,शिवराज गंगुलवार,आनंदराव सावरगावे यांनी अवघ्या सहा तासात आरोपी नरेश बजरंगराव जाधव (रा.माष्टी ता.धर्माबाद) यासअटक केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,व्यंकट घोंगडे,यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून सर्व पुरावे गोळा केले आणि गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ३६ तासाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
या उल्लेखनीय आणि वेगवान कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री.अबिनाश कुमार यांनी कुंडलवाडी पोलीस पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Tags: Siddharth Kamble
Previous Post

जिल्हास्तरीय श्रीनिवास रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचा उज्ज्वल यश

Next Post

बीडमध्ये छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना ‘दामिनी’चा दणका; १९ जणांवर कारवाई

Related Posts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
18
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
103
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
15
क्राईम

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

July 12, 2026
198
Next Post
बीडमध्ये छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना ‘दामिनी’चा दणका; १९ जणांवर कारवाई

बीडमध्ये छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना 'दामिनी'चा दणका; १९ जणांवर कारवाई

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In