• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 10, 2026
in Blog
0
कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत, अभंग आणि गौळणींची सुरेल मेजवानी; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी : भारत कवितके

RelatedPosts

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

कांदिवली पश्चिम येथे दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी पहाट’ हा सांगीतिक कार्यक्रम उत्साहात आणि रंगतदार वातावरणात संपन्न झाला. मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक राजाराम सुतार अर्थात बाबल गुरुजी यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

शैलजा गिरकर फाऊंडेशन आणि श्री दत्त कृपा संगीत विद्या प्रसारक मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शैलजा गिरकर फाऊंडेशनच्या विश्वस्त क्रांती गिरकर कुंदर आणि माजी मंत्री आमदार विजयभाई गिरकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.

या संगीत मैफलीत शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत, अभंग आणि गौळण अशा विविध संगीत प्रकारांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी परंपरांचा संदर्भ देत बाबल गुरुजी यांनी विविध रचनांचे सादरीकरण केले. ‘माधो पिया बिदेश गयो’, ‘गुंतता हृदय हे’, ‘हा प्रणय परिमळे’, ‘विठ्ठल कानडू बोलू’, ‘सण दिवाळीचा आला’, ‘देव देखिला देखिला, आम्हा आनंद झाला’, ‘सुरत मधून वाजवितो रुणझुण’ आणि ‘अखंड लागले ध्यान’ यांसारख्या रचनांनी कार्यक्रमात रंगत आणली.

संतपरंपरेतील अभंग सादर करताना ‘काळ देहाशी आला’ या अभंगातून संतांनी मृत्यूकडे पाहण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोनही उलगडून दाखविला. बाबल गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक बाळा तावडे, प्रमोद घाग, संजय बाविस्कर, संतोष घाडगे, विजय गवळी, कल्पेश घाग आणि राधेश्याम गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला.

या सुरेल दिवाळी पहाट कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संगीताचा आनंद घेत रसिकांनी दिवाळी सणाची सुरेल सुरुवात केली. कार्यक्रमामुळे कांदिवली परिसरात सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

Related Posts

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!
Blog

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

November 10, 2026
1
आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
60
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!
Blog

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026
9
Blog

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

November 7, 2026
6
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!
Blog

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
20
ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
46

ताज्या बातम्या

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026
सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

November 10, 2026

आईपासून दुरावलेली बिबट्याची दोन पिल्ले पुन्हा मायेच्या कुशीत!

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In