• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

राजुरी (ता. जुन्नर): महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी येथे आयोजित भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये अभियांत्रिकीच्या एकूण २२ गुणवंत विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.

या निवड प्रक्रियेत सॅमसंग समूहाच्या हर्मन इंटरनॅशनल सॅमसंग कंपनी तसेच जॉन डियर ग्रुपची विरिटेगन इंडिया या कंपन्यांचा प्रमुख सहभाग होता. महारिया चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार सचिन चव्हाण, संचालक के. आर. भानुशाली आणि अकॅडमिक डीन पी. बालारामडू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया उत्साहात पार पडली.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर (TPO) प्रा. मुरलीधर कुरकुटे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सॅमसंग आणि जॉन डियरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणे ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

कॅम्पस भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, तांत्रिक मुलाखत आणि मानव संसाधन (HR) मुलाखत अशा विविध टप्प्यांचा समावेश होता. या सर्व टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग प्रमुख तसेच सर्व प्राध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामागे गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योगाभिमुख उपक्रमांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उल्लेखनीय यशामुळे सह्याद्री व्हॅली महाविद्यालयाच्या प्लेसमेंट परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Previous Post

सिंधुदुर्गात ताज समूहाचे पहिले ५ स्टार हॉटेल प्रकल्प: मंत्रालयात आढावा बैठक

Next Post

‘महिला रत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने सौ. मनीषा आव्हाड यांचा गौरव

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
10
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
14
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
18
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
38
Next Post
‘महिला रत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने सौ. मनीषा आव्हाड यांचा गौरव

‘महिला रत्न’ राज्यस्तरीय पुरस्काराने सौ. मनीषा आव्हाड यांचा गौरव

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In