• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मापोलीत ‘अखंड हरिनाम सप्ताहाची’ भक्तीमय सांगता; हनुमान जन्मोत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

आंबेगाव (पुणे): प्रतिनिधी
तालुक्यातील मापोली येथे श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या १० व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाली. शुक्रवार, दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

बुधवार, ०१ एप्रिलपासून सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकडा भजन, विष्णुपूजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन अशा विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पहाटे काकडा भजनानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. भास्कर महाराज जगदाळे यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या सप्ताहात मापोलीसह परिसरातील तसेच मुंबई आणि पुणे येथील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ, हनुमान तरुण मंडळ आणि हनुमान काकडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून, श्री हनुमान जन्मोत्सवाच्या या पवित्र पर्वावर मापोली गाव हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले.

Tags: Ananta Lohakare
Previous Post

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; नेत्यांकडून तातडीने पाहणी, नुकसानभरपाईचे आश्वासन

Next Post

मापोली परिसरात गारपिटीचा हाहाकार; स्ट्रॉबेरीसह कांदा पिकांचे लाखोंचे नुकसान

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
60
Next Post

मापोली परिसरात गारपिटीचा हाहाकार; स्ट्रॉबेरीसह कांदा पिकांचे लाखोंचे नुकसान

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In