• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या भांड्यात विक्रीस बंदी; अफवांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या भांड्यात विक्रीस बंदी; अफवांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

धाराशिव (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत अफवा पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची खुल्या भांड्यात विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) यांनी ५ मार्च २०२६ रोजी हा आदेश काढला आहे. आदेशात नमूद केल्याप्रमाणे, पेट्रोल-डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्याची खुल्या पद्धतीने विक्री केल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदी विचारात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार, पेट्रोल व डिझेल हे केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करावे. कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही खुल्या भांड्यात इंधन विक्री अथवा पुरवठा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून विक्रीची नोंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास पेट्रोलियम नियम २००२ मधील नियम १९८ ते २०२, तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांमुळे अनावश्यक गर्दी होऊ नये आणि कोणतीही दुर्घटना घडू नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

बेलगाव ग्रामपंचायत भरती प्रकरण तापले; १३ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

भ्रमण आपल्या भारत देशाचे – 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश – ओमप्रकाश शर्मा

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
भ्रमण आपल्या भारत देशाचे – 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश – ओमप्रकाश शर्मा

भ्रमण आपल्या भारत देशाचे - 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश - ओमप्रकाश शर्मा

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In