• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भ्रमण आपल्या भारत देशाचे – 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश – ओमप्रकाश शर्मा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
भ्रमण आपल्या भारत देशाचे – 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश – ओमप्रकाश शर्मा
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

मित्रहो, आजचा हा भारत भ्रमणा चा लेख सहावा, आतापर्यंत पाच लेख मी लिहून नऊ पेपर मध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत .. आजचा हा सहावा लेख मी वाचकांपर्यंत पोहोचवत आहे, भारत भ्रमण चा लेख, भारत भ्रमण करताना भारतातील इस्कॉन मंदिर, इस्कॉन चे जे पण भारत देशात मंदिरे आहेत ते सर्व मी पाहिले व दर्शन घेऊन आलोय,, मायापुर पश्चिम बंगाल इस्कॉन मंदिर असो की बेंगलोर, पुणे असो किंवा भारतातील प्रत्येक शहरातील इस्कॉन मंदिरे मी बघितली, अतिशय सुंदर सुबक भगवंताच्या मूर्ती त्या मंदिरात आहेत,
इतिहासाच्या पाऊलखुणा, संस्कृतीचा संगम, प्राचीन आणि आधुनिक ठिकाणी मी भेटी दिल्या, निसर्ग, निसर्गातील सर्व लेक, अभयारण्ये,गार्डन, प्राणी संग्रहालय मी फिरताना एक रोमांचक सफर, साहसी भारत, भारताची अनवट वाट, छोटे मोठे सर्व ठिकाण,भारत दर्शन, माझे अनोखे अनुभव, सर्व मी कमी बजेटमध्ये केले, अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक, आपला अतुल्य भारत देश एक अद्भुत सफारी, माझी भारत यात्रा मी हिमालय पासून कन्याकुमारी पर्यंत व सेवन सिस्टर ते पोरबंदर ओखा,दिव दमन पर्यंत, स्वदेश दर्शन भारताच्या मातीत दडलेले सौंदर्य, भारताची भटकंती एक अविस्मरणीय अनुभव, संस्कृती व इतिहास विविधतेत एकता, भारत भ्रमणाची एक झलक माझ्या भारत यात्रेचे संस्मरण, आज ह्या लेखद्वारे मी माझ्या शब्दातून मांडत आहे,
भारत भ्रमण, एकाच देशात अनेक देश अनुभवण्यासारखा एक अद्भुत प्रवास आहे, बर्फाच्छादित शिखरे, राजस्थान मधील वाळवंट, केरळ मधील बॅकवॉटर, आसाम मधील चहा चे मळे,दक्षिण भारतातील मंदिरे व काश्मीरचे सौंदर्य असे वैविध्यपूर्ण अनुभव भारताच्या यात्रेमध्ये मला मिळाले विविधता इतिहास आणि संस्कृतीचा हा उत्तम मिलाप आहे,

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात


भारत भ्रमणामधील काही प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तर भारतातील दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू, आग्रा येथील ताजमहाल,अमृतसर चे स्वर्ण मंदिर, भारत पाकिस्तान ची सीमा व हिमालयातील सुंदरसे निसर्ग सौंदर्य, दक्षिण भारतातील केरळ,तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य, तामिळनाडू मधील भव्य दिव्य मंदिरे , संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत अनुभव, पश्चिम भारतातील महाराष्ट्र गुजरात कोकण आणि राजस्थान मधील किल्ले वाळवंट आणि खाद्य संस्कृती, पूर्व ईशान्य भारतामधील अरुणाचल प्रदेश, ची नैसर्गिक सौंदर्य, माणिपूर मेघालय , अननस व चहाचे मळे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले ठिकाणे, मित्रहो भारत भ्रमण करताना तुम्हाला काही टिप्स देऊ इच्छितो, प्रवासापूर्वी योग्य नियोजन करणे भेट देण्याची ठिकाणे आहेत राहण्याची सोय खानपान याचा पूर्व अभ्यास करणे, वाहतूक मध्ये रेल्वे भारत फिरण्यासाठी उत्कृष्ट आणि स्वस्त पर्याय आहे, स्थानिक संस्कृती स्थानिक लोकांच्या खाण्यापिण्याचे सभेने परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न करा, भारत ग्रहणामुळे केवळ मनोरंजना इतर आपल्याला देशाच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृती बद्दल खूप काही शिकायला मिळते,
आपला भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालेला भारत 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक बनला हा जगातील सातवा सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला आणि सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे नवी दिल्ली ही भारताची राजधानी असून 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा हा एक संघ आहे,


भारत आशिया खंडाच्या दक्षिणेस असून पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंद महासागर आहे, उत्तरेस हिमालय पर्वत रांगा आहेत, विविधतेत एकता हे भारताचे मुख्य वैशिष्ट्य असून येथे अनेक धर्मभाषा, संस्कृती आणि सणवार एकत्र नांदतात, आपला भारत देश की प्राचीन हिंदू संस्कृतीची भूमी असून अनेक थोर राज्य सम्राट आणि थोर पुरुषांचा इतिहास येथे घडला आहे, संस्कृती अध्यात्मिक ज्ञानाचा वारसा लाभलेला एक सामर्थ्यशाली देश म्हणून जगात आपला भारत देश ओळखला जातो, भारताचे प्राचीन आणि जुने नाव जंबुदीप व भारत वर्ष हे देखील होते,
ऐतिहासिक ग्रंथानुसार राजा भरत यांच्या नावावरून या भूमीला भारत म्हटले गेले तसेच आर्य संस्कृती नुसार आर्यवर्त असे संबोधले जात असे,
प्रत्येक राज्यातील प्रत्येक शहरात फिरताना त्या त्या राज्यातील विविधता तेथील मंदिरे अभयारण्य गार्डन किल्ले लेक, राजवाडे, तारांगण म्युझियम हे सर्व पाहून मला आपल्या देशाचा फार अभिमान वाटला, पर्यटन म्हटले की काही गोष्टी व्यवस्थित प्लॅन केल्यामुळे आणि काही गोष्टी अचानक अनुभवायला मिळाल्यामुळे मजा वाटते काश्मीरच्या ट्रिप मध्ये केरळच्या ट्रिप मध्ये अंदमानच्या ट्रिप मध्ये लक्षदीपच्या ट्रीप मध्ये, लेह लड्डाखआणि सेव्हन सिस्टर्स फिरताना खूप खूप मनाला आनंद वाटला,


एखादे देऊळ बघायला जावे आणि त्या देवळाच्या पाठीमागे एखादा खडा किंवा हिरवीगार टेकडी दिसावी मग तिथे रमावे असे मी खूप ठिकाणी अनुभवले,
एकंदर काय तर भारत भ्रमण मध्ये प्रवास म्हणजे नव्या अनुभवांची पोचडी प्रवासात आपले नाक कान डोळ्यांनी मेंदू उत्सुक ठेवला की अनेक अनुभव घेत आपण शहाणे होऊ शकतो प्रवास विषयक एक कोटेशन आपण जेवढे प्रवास करून तेवढे नम्र होतो कारण विविधतेने नटलेल्या मोठ्या जगात आपण किती छोटे आहोत हे आपल्याला समजते,
विज्ञान भूगोल ऐतिहासिक पुस्तके वाचताना पाठ्यपुस्तकात अनेक सरांचा उल्लेख येतो यातील काही ठिकाणांची रंजक माहिती मी स्वतः भारत भ्रमण करताना प्रवास करताना मला अनुभवयास मिळाली, बरेच ठिकाण पाहिलेली, ती आठवल्यानंतर मनाला कायम आनंद देत राहतात,
मी भारत भ्रमण करताना टप्प्याटप्प्याने अकरा ते बारा वर्षे प्रवास करून स्व कमाई ने व एकट्याने स्वतःचे 18 लाख रुपये जवळपास खर्च करून मी संपूर्ण भारत देश आपला फिरून, अनुभवाची शिदोरी आज माझ्याजवळ आहे आणि खूप काही भारत देशातील धार्मिक स्थळांची पर्यटन स्थळांची माहिती ज्ञानदेखील माझ्याकडे आहे म्हणजे मला प्राप्त झाले मित्रहो,.. भारत देशातील सर्व नद्या, आणि अरबी समुद्र हिंद महासागर बंगालची खाडी हे सर्व ठिकाणी मी फिरलो, चार धाम यात्रा असो की सर्व शक्तीपीठे सर्व धर्मातील सर्व प्रसिद्ध धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे त्या ठिकाणी मी जाऊन आलो मित्रांनो, भारत देशाबद्दल वर्णन करावे तेवढे कमी च आहे, शब्द खूप अपुरे पडतील मित्रहो लिहायचे म्हंटल्यास, पाहुणचार कौटुंबिक मूल्ये,लवचिकता, शिक्षणप्रती आदर, अध्यात्मिकता ,शैक्षणिकता आणि सर्जनशीलता हे सर्व भारतीया मधील सदगुण आहेत, भारताचे चैतन्यमय आणि वैविध्यपूर्ण समाजाच्या जडणघडणीत योगदान देतात,


मला भारत देश का आवडतो कारण की भारताला एक गौरवशाली इतिहास असून प्राचीन संस्कृती लाभलेली आहे, आपले अनेक सण आहेत आणि आपण विविध संस्कृती परंपराचे पालन करतो, उत्तरेकडील हिमालय,पर्वतरांगा आपले रक्षण करतात, भारत अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, आणि हिंद महासागराने वेढलेला आहे अद्भुत सौंदर्य जंगले, गंगा यमुना सरस्वती या केवळ नद्या नसून त्याचे पाणी अमृत समान आहे, ऋषीमुनींची तपस्वी भूमी, अनेक ठिकाणी गुहा मध्ये साधू संत तपस्या करताना मी पाहिलेत,
उत्तराखंड ही देवभूमी, आणि भूतान व नेपाळ देश हे दोन देश सुद्धा मी भारत भ्रमण सोबतच ते देशही फिरलो मित्रांनो, मन खूप खूप प्रफुल्लित आणी आनंदी झाले मित्रहो भारत भ्रमण करून भारत देश पाहुन सर्व…. मनात ठाणले होते मी भारत भ्रमण करायचे ते मी पूर्ण ही केले ह्याचा मला स्वाभिमान आहे… ग्रामीण भागातून अनेक समस्या बाजूला ठेवून, साहस चिकाटी जिद्द जोपासून एकट्याने भारत भ्रमण मी केले, बघता बघता 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश अंदमान व लक्षद्विप व भूतान नेपाळ देशात ही 2 /3 वेळा जाऊन तेथील मंदिर, स्तूप व निसर्ग खूप जवळून पाहावयास मिळाला मला, पशु पक्षी प्राणी, वनस्पती, झाडे, फुले, फळाच्या बागा, अनेक वृक्ष, जे कधीच पाहायला मिळाले नाहीत ते बघण्याचे भाग्य पण लाभले मला…

मित्रहो एकच जरूर सांगेन आपण सुद्धा पर्यटन व धार्मिक स्थळें फिरून यावे. व ज्ञान वाढते खूप प्रवासाने हे नक्कीच सांगेल मी…
काही माहिती हवी असल्यास आपण मला सोशल मीडिया वर व गुगल वर शोधू शकता… भारत भ्रमण किया हुवा युवक हे नावं गुगल वर टाकावे किंवा माझे हे दोन मोबाईल क्रमांक देखील आपण गुगल वर टाकून पाहू शकता 9156438966/9975375264… ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा.. बोरी. ता -जिंतूर जिल्हा परभणी. महाराष्ट्र….

Tags: Omprakash Sharma
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या भांड्यात विक्रीस बंदी; अफवांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

Next Post

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये साईशा बागुलचा राज्यात ५ वा क्रमांक; उज्ज्वल यशाने सर्वत्र कौतुक

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये साईशा बागुलचा राज्यात ५ वा क्रमांक; उज्ज्वल यशाने सर्वत्र कौतुक

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये साईशा बागुलचा राज्यात ५ वा क्रमांक; उज्ज्वल यशाने सर्वत्र कौतुक

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In