• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेलगाव ग्रामपंचायत भरती प्रकरण तापले; १३ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
बेलगाव ग्रामपंचायत भरती प्रकरण तापले; १३ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

शेवगाव (प्रतिनिधी – लक्ष्मण मडके) : बेलगाव ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा कर्मचारी भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने युवक संदीप नानासाहेब काकडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

काकडे यांनी पंचायत समिती शेवगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

भरती प्रक्रियेदरम्यान नियमबाह्य प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून, परीक्षेच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे पती परीक्षा केंद्रात उपस्थित असल्याचे अनेक परीक्षार्थींनी ग्रामसभेत नमूद केल्याचे काकडे यांनी सांगितले. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांचे लेखी जबाब, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाने सादर केलेला प्राथमिक चौकशी अहवाल अपूर्ण व एकतर्फी असल्याचा आरोप करत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये २६ जानेवारी २०२६ च्या ग्रामसभेतील मुद्दा नोंदवलेला नसल्याने संशय अधिक गडद झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार तसेच मागील पाच वर्षांतील विकासकामांमध्ये आर्थिक अनियमिततेचे आरोपही करण्यात आले आहेत. या सर्व बाबींवर अद्याप ठोस चौकशी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण झाल्याचे काकडे यांनी सांगितले.

यापूर्वी प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिले होते; मात्र तीन महिने उलटूनही कारवाई न झाल्याने आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भरती प्रक्रिया रद्द करणे, निष्पक्ष पुनर्चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे तसेच मागील विकासकामांची चौकशी करणे या प्रमुख मागण्यांसह हे आंदोलन छेडले जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर वातावरण तापले असून, १३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

Tags: Laxman Madke
Previous Post

दर्यापूरमध्ये शीतल गॅस एजन्सीवर संताप; वितरणातील अनियमिततेवर कारवाईची मागणी

Next Post

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या भांड्यात विक्रीस बंदी; अफवांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
55
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या भांड्यात विक्रीस बंदी; अफवांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

धाराशिव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या भांड्यात विक्रीस बंदी; अफवांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In