• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्नडच्या शिरपेचात मानाचा तुरा: देभेगावचे शेतकरी बाबासाहेब लगड यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट डाळिंब उत्पादक’ पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
कन्नडच्या शिरपेचात मानाचा तुरा: देभेगावचे शेतकरी बाबासाहेब लगड यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट डाळिंब उत्पादक’ पुरस्कार
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

कन्नड (प्रतिनिधी) : तालुक्यातील देभेगाव येथील प्रयोगशील तरुण शेतकरी श्री. बाबासाहेब शेषराव लगड यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या बळावर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत कन्नड तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना ‘महाराष्ट्र उत्कृष्ट डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कृषी अधिकारी श्री. गौसाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्यभरातून निवडलेल्या सुमारे २५० प्रगतशील शेतकऱ्यांमधून केवळ ८ उत्कृष्ट उत्पादकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये बाबासाहेब लगड यांनी प्रथम क्रमांक पटकावत विशेष मान मिळवला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

११ महिन्यांत विक्रमी उत्पादन
बाबासाहेब लगड यांनी साडेतीन एकर क्षेत्रात सुमारे १,८०० डाळिंब झाडांची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी अवघ्या ११ महिन्यांत विक्रमी उत्पादन घेतले. १३ महिन्यांच्या बागेतून उच्च प्रतीचे डाळिंब उत्पादन घेतल्याने त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली.

मान्यवरांकडून गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य तथा प्रदेश सदस्य प्रा. डॉ. संजय गव्हाणे यांनी बाबासाहेब लगड यांचा विशेष सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती अधिक फायदेशीर आणि समृद्ध होऊ शकते.”

या पुरस्कारामुळे देभेगावसह संपूर्ण कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, बाबासाहेब लगड यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

हृदयविकाराच्या झटक्याने ग.भा. गजराबाई मुळूक यांचे निधन; परिसरात हळहळ

Next Post

दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
49
Next Post
दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

दत्त शिखर संस्थानचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In