• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाथरी तालुक्यात गुटखा विक्रेत्यांचा सुळसुळाट; ग्रामीण भागात खुलेआम विक्रीवर नागरिक संतप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाथरी तालुक्यात गुटखा विक्रेत्यांचा सुळसुळाट; ग्रामीण भागात खुलेआम विक्रीवर नागरिक संतप्त
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

पाथरी ( प्रतिनिधी) :
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. शासनाने बंदी घातलेली असतानाही अनेक किराणा दुकानांमध्ये व फिरत्या विक्रेत्यांमार्फत गुटखा खुलेआम विकला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बाबळगाव, बाबळगाव फाटा, लोणी, गुंज, उमरा, गोंडगाव, अंधापुरी आणि कानसुर या भागांमध्ये काही विक्रेते मोटारसायकल व चारचाकी वाहनांद्वारे गुटखा पुरवठा करत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. हे विक्रेते थेट दुकानदारांना माल पोहोचवत असल्याने बंदी केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

या प्रकारामुळे लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत असल्याची गंभीर चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. काही भागांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिणाम, तसेच आजारांचे प्रमाण वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, पाथरी पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार सुरू असतानाही अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केल्याचा दावा करण्यात येत असला तरी ग्रामीण भागात गुटखा विक्रीवर ठोस नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

वृक्षवल्ली आम्हा सोयरे! आयएएस तुकाराम मुंढे यांचा पर्यावरणपूरक आदर्श; आईच्या अस्थींवर ‘स्मृती वृक्ष’ रोपण

Next Post

के.के.एम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
12
ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
17
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
21
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
12
Next Post
के.के.एम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

के.के.एम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In