• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारवाईविरोधात मध्यप्रदेशातही संताप; हद्दपारी आदेश रद्द करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारवाईविरोधात मध्यप्रदेशातही संताप; हद्दपारी आदेश रद्द करण्याची मागणी
0
SHARES
656
VIEWS
Ad 1

नंदुरबार/प्रतिनिधी :
नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारवाईविरोधात आता मध्यप्रदेशातही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या हद्दपारीच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मध्यप्रदेशातील खेतिया व पानसेमल येथील पोलिस ठाण्यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात बिरसा फायटर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रवण दत्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय दबावाखाली, सूडबुद्धीने आणि अधिकाराचा गैरवापर करून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित हद्दपारी आदेश तात्काळ रद्द करून श्रवण दत्त यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, इंटरनेशनल आयडॉल तथा बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, रविंद्र वळवी, सतीश ठाकरे, गोपाल भंडारी, रोहीदास वळवी, पंकज वळवी, अजय वळवी, दिलीप मुसळदे आणि ॲड. राहूल कुंवर या ९ सामाजिक कार्यकर्त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

या कारवाईविरोधात आधीच नंदुरबार जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शहादा ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने निषेध नोंदवला आहे. तसेच जिल्ह्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत आंदोलन छेडले आहे. आदिवासी समाजातही या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, संबंधित कार्यकर्त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप होत असून, ही कारवाई असंवैधानिक व बेकायदेशीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Tags: Vasant Pawara
Previous Post

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची उदगीर येथे संवाद बैठक संपन्न

Next Post

पिंपरडोळी येथे भव्य श्रामणेर शिबीर व धम्म परिषद उत्साहात संपन्न

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
पिंपरडोळी येथे भव्य श्रामणेर शिबीर व धम्म परिषद उत्साहात संपन्न

पिंपरडोळी येथे भव्य श्रामणेर शिबीर व धम्म परिषद उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In