• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येडेश्वरी यात्रेत सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
येडेश्वरी यात्रेत सोनसाखळी चोरणारी टोळी जेरबंद; १.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील येडेश्वरी यात्रेदरम्यान महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे यात्रेतील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

दि. ३ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक यात्रेत गस्त घालत होते. यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली होती.

दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन महिला व एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल तपासात आरोपींची ओळख अनिल शेषेराव शिंदे (वय ३४), सुनीता अनिल शिंदे (वय २९) व हिराबाई रमेश शिंदे (वय ४०, सर्व रा. इंदिरानगर, पाथरी, जि. परभणी) अशी पटली.

पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता आरोपी अनिल शिंदे याच्या ताब्यातून चार सोन्याचे मंगळसूत्र आढळून आले. चौकशीत आरोपींनी यात्रेतील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून ते एकत्र करत असल्याची कबुली दिली.

या कारवाईत एकूण सुमारे १ लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस कर्मचारी शोभा बांगर, पोलीस कर्मचारी मेहबूब अरब व चालक रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

येडेश्वरी यात्रेत अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांनी वचक बसवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

“नेतृत्व की फक्त दिखावा?” — जागरूक नागरिकांसाठी एक आरसा

Next Post

जळक गावच्या सुपीकला वाघमारे यांची पोलिस दलात कॉन्स्टेबलपदी निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
1
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
3
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
6
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
44
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
15
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post

जळक गावच्या सुपीकला वाघमारे यांची पोलिस दलात कॉन्स्टेबलपदी निवड; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In