• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दत्तशिखर चे प.पु. महंत श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज अनंतात विलीन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

श्री.श्री.१००८ प.पु. डॉ.धनेश्वर गुरु मधुसूदन भारती महाराज दत्तशिखर संस्थानचे नवे उत्ताधिकारी

माहूर – हिंदू धर्मातील एक मह्त्वाचे पीठ असलेल्या माहूर येथील दत्तशिखर संस्थानचे महंत श्री श्री १००८ मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती हे दिनांक ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने आनंदलिन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार आज दि. ५ एप्रिल दुपारी ३ वाजता दत्तशिखर संस्थान येथे साधू संतांच्या व लाखो भाविक भक्तांच्या उपस्थित सन्याशी परंपरे प्रमाणे देवा दत्ता दत्त्ता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबराच्या गजरात वेद मंत्राच्या गजरात करण्यात आले. दत्तशिखर संस्थान परंपरेनुसार व संस्थानच्या न्यास नोंदणी योजनेनुसार येथील गादी परंपरा असल्याने महंत हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तसेच गादीचे नवे उतराधिकारी निवडल्या शिवाय आनंदलीन झालेल्या महंतांचे अंत्यविधी करता येत नाही अशी धार्मिक परंपरा असल्याने येथील दत्त शिखर संस्थानातील मोठे घोडेघर, लहान घोडेघर, मोठे हवेली घर , लहान हवेली घर या घरातून प्रत्येकी एक प्रतिनिधी या पदासाठी पात्र असतात त्या सन्याशी साधू मधून एकाची उत्तराधिकारी म्हणून निवड करावयाची असते. त्यानुसार आज दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास दत्तशिखर येथे माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी लाखो भाविक व हिंदू धर्मीय विविध आखड्याचे प्रतिनिधी व साधू संत यांच्या उपस्थिती व साक्षीने निवड प्रकिया राबविली. सदर निवड प्रक्रिया ऑनस्क्रीन पद्धतीने ऑन कॅमेरा राबविली. दत्तशिखर संस्थान गादीचे उतराधिकारी पदासाठी मोठे घोडेघर, लहान घोडेघर व मोठे हवेली घर , लहान हवेली घर मधून १ ) डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती, महाराज २) वासुदेव भारती गुरु बळीराम भारती महाराज ३) धनराज भारती गुरु शालीग्राम भारती महाराज या तीन सन्याशी साधुनी नामांकनपत्र सादर केले.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

त्यामध्ये नामांकन परत घेण्याच्या मुदतीत वासुदेव भारती गुरु बळीराम भारती महाराज यांनी नामांकन परत घेतल्याने डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती महाराज व धनराज भारती गुरु शालिग्राम भारती महाराज या दोन साधूंच्या नावाच्या दत्तचिट्ठी तांब्याच्या पवित्र कमंडलुमध्ये टाकून कर्नाटक येथील ५ वर्षाच्या बालक भाविकाच्या हस्ते भगवान दत्तप्रभूच्या समोर दत्तचिट्ठया काढण्यात आल्या.

त्यामध्ये सुरवातीच्या तिन्ही वेळी डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती महाराज यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती महराज यांची दत्तशिखर संस्थान माहूर चे नवे महंत व उतराधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली.

सन्याशी परंपरेप्रमाणे डॉ. धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती यांचे मुंडन करून पंचामृत स्नान करून तदनंतर भस्मलेपन करून प.पु.श्री.श्री.१००८ डॉ. धनेश्वर गुरु मधुसूदन भारती असे नवे नामकरण करण्यात आले. त्यानंतर दत्तशिखर संस्थानच्या परंपरागत गादीवर त्यांना विराजमान करण्यात आले. त्यानंतर दत्तवासी प.पु. श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज यांना दत्तशिखर मंदिराच्या परिसरात समाधिस्त करण्यात आले.

प.पु.श्री.श्री.१००८ डॉ. धनेश्वर गुरु मधुसूदन भारती महाराज संस्थांनचे 31 वे महंत झाले आहेत

दि. १९ एप्रिल रोजी दत्तशिखर संस्थान येथे प.पु. श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज यांची सोळस पूजा आयोजित करण्यात आली असून सर्व साधू संत, महापुरुष व भाविक भक्तांनी महाप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्तशिखर संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

मेकर–दरेगाव बस सेवा सुरू करण्याची मागणी; प्रवाशांचे हाल वाढले

Next Post

ईवळेश्वर क्रीडांगण घोटाळा प्रकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात; दोषींवर कारवाईचे आश्वासन

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
1
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
37
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
ईवळेश्वर क्रीडांगण घोटाळा प्रकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात; दोषींवर कारवाईचे आश्वासन

ईवळेश्वर क्रीडांगण घोटाळा प्रकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात; दोषींवर कारवाईचे आश्वासन

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In