• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ईवळेश्वर क्रीडांगण घोटाळा प्रकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात; दोषींवर कारवाईचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
ईवळेश्वर क्रीडांगण घोटाळा प्रकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात; दोषींवर कारवाईचे आश्वासन
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहुचर्चित ईवळेश्वर येथील क्रीडांगण व समपातळीकरणाच्या कामातील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता आमदार भीमराव केराम यांच्या दरबारात पोहोचले आहे. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य प्रफुल जाधव यांनी यासंदर्भात निवेदन सादर करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सन २०२४-२५ अंतर्गत मौजे ईवळेश्वर (ता. माहूर, जि. नांदेड) येथे क्रीडांगण व समपातळीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्षात काम न करता बिल उचलण्यात आल्याचा गंभीर मुद्दा निवेदनात मांडण्यात आला असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

प्रफुल जाधव यांनी यापूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), शिक्षणाधिकारी तसेच क्रीडा व युवा सेवा विभागाकडेही तक्रार दाखल केली होती. तसेच दि. ९ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय माहूर समोर उपोषणही करण्यात आले होते. या वेळी दि. १० मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी लेखी आश्वासन देत उपोषण सोडवले होते.

दरम्यान, प्रकरणासंबंधीची सर्व कागदपत्रे व पुरावे आमदार भीमराव केराम यांना सादर करण्यात आले असून त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. “या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात आमदारांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे आता पुढे काय कारवाई होते याकडे ईवळेश्वरसह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, “या प्रकरणात प्रशासनातील अनेक घटकांनी अनियमितता केल्याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. जर कारवाई झाली नाही, तर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात रिट याचिका दाखल करू,” असा इशाराही प्रफुल जाधव यांनी दिला आहे.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

दत्तशिखर चे प.पु. महंत श्री श्री १००८ मधुसूदनजी भारती महाराज अनंतात विलीन

Next Post

‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
1
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
37
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ

‘चलो मढी’चा नारा; राज्यस्तरीय अधिवेशनातून शेतरस्ता चळवळीला नवे बळ

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In