• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“दुसरबीड पेटलं!” उपोषण तीव्र; कारवाई न झाल्यास गाव बंदचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in Blog
0
“दुसरबीड पेटलं!” उपोषण तीव्र; कारवाई न झाल्यास गाव बंदचा इशारा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील दुसरबीड येथे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांमुळे ग्रामस्थांचा संताप उसळला असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सुरुवातीला शांततेत सुरू झालेले आंदोलन आता आक्रमक वळणावर पोहोचले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

देऊळगाव मही धरणाच्या पाणीपुरवठा योजनेची पाइपलाईन अपूर्ण राहिल्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाइपलाईन टाकताना उकरलेले रस्ते अद्याप दुरुस्त न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय घनकचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि रखडलेली विकासकामे यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या आंदोलनाला आता विविध स्तरांतून पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी योद्धा कृती समितीचे बालाजी सोसे यांनी उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा देत प्रशासनावर टीका केली. तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री नानासाहेब तौर, तालुका उपाध्यक्ष सुरेश बुलकडे आणि अल्पसंख्याक आघाडीचे महामंत्री जावेदभाई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रशासनाला इशारा दिला.

“उपोषणावर तात्काळ ठोस कारवाई झाली नाही, तर दुसरबीड बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल,” असा कडक इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

उपोषणस्थळी बसलेले ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असून त्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, “दुसरबीड बंद”च्या इशाऱ्यामुळे गावातील वातावरण अधिकच तापले असून हे आंदोलन प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Previous Post

माहूरमध्ये रेती घाटांवर वाढता गुन्हेगारीचा धोका; लांजी रेतीघाट बंद करण्याची मागणी

Next Post

यवत पोलिसांची मोठी कारवाई: पुणे–सोलापूर महामार्गावर २० लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
11
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
17
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
223
Next Post
यवत पोलिसांची मोठी कारवाई: पुणे–सोलापूर महामार्गावर २० लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

यवत पोलिसांची मोठी कारवाई: पुणे–सोलापूर महामार्गावर २० लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In