• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूरमध्ये रेती घाटांवर वाढता गुन्हेगारीचा धोका; लांजी रेतीघाट बंद करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूरमध्ये रेती घाटांवर वाढता गुन्हेगारीचा धोका; लांजी रेतीघाट बंद करण्याची मागणी
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) : माहूर शहर व तालुक्यात रेती घाटांवर वाढत्या हाणामारीच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून भविष्यात कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी लांजी रेतीघाट तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष तथा GR महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मराठवाडा प्रमुख समाधान कांबळे यांनी केली आहे.

लांजी रेतीघाट हा सर्वसामान्य व गरीब घरकुलधारकांना माफक दरात वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आला होता. मात्र काही रेती माफियांमुळे येथे काळाबाजार सुरू असून सामान्य नागरिकांना वाळू मिळणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी वाळू चोरीचे प्रकार वाढल्याचेही समोर आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

दि. ५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास २० ते २५ जणांच्या टोळक्याने, हातात शस्त्रे घेऊन, लांजी घाट परिसरातील शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत काही शेतकरी जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या हाणामारीच्या घटना तालुक्यातील इतर घाटांवरही घडत असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वीही रेती घाटांवर दोन गटांमध्ये वाद, हाणामारी तसेच गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला होता, तर एका लोकप्रतिनिधीच्या वाहनालाही धडक देण्याचा प्रकार घडला होता. याशिवाय महसूल व पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ल्याच्या घटना घडल्याचे नमूद करण्यात आले.

पैनगंगा नदी पात्रातून रात्रीच्या वेळी जेसीबी व बोटीद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या नियमांचे पालन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर लांजी रेतीघाट तात्काळ बंद करावा, तसेच संबंधित अट्टल गुन्हेगारांना तडीपार करावे, अशी मागणी समाधान कांबळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून “आगरी व कोळी समाज सेल” राज्यप्रमुखपदी सीए निलेश पाटील यांची नियुक्ती

Next Post

“दुसरबीड पेटलं!” उपोषण तीव्र; कारवाई न झाल्यास गाव बंदचा इशारा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
49
Next Post
“दुसरबीड पेटलं!” उपोषण तीव्र; कारवाई न झाल्यास गाव बंदचा इशारा

"दुसरबीड पेटलं!" उपोषण तीव्र; कारवाई न झाल्यास गाव बंदचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In