• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिलेखनवाडी येथील उपोषण अखेर मागे; आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा मोठा निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिलेखनवाडी येथील उपोषण अखेर मागे; आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचा मोठा निर्णय
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा नेवासा तालुका पप्रतिनिधी
श्री नाथाभाऊ शिंदे पाटील ९८२२५०३३४२

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

नेवासा (प्रतिनिधी): तालुक्यातील चिलेखनवाडी येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी लोकनियुक्त सरपंच श्री. भाऊसाहेब सावंत आणि ग्रामस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण व धरणे आंदोलन अखेर यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी केलेल्या विशेष मध्यस्थीमुळे आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन संपल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाथाभाऊ शिंदे यांची महत्त्वपूर्ण मध्यस्थी

उपोषणाची दखल घेत नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांसह, राजेंद्र गरड आणि बाळासाहेब थोरात यांच्या समवेत उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून उपोषण सोडवण्याचा आग्रह धरला. ग्रामस्थांच्या समस्यांच्या निवारणासाठी त्यांनी तत्काळ नेवासा तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आमदारांनी सर्व रास्त मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

प्रशासकीय हालचाली आणि लेखी आश्वासन

आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या रस्त्यांच्या मोजणीच्या प्रश्नावर नाथाभाऊ शिंदे यांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक संदीप गोसावी यांच्याशी संपर्क साधून कामाला गती देण्याचे सूचित केले. तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्री. संदीप चिंतामणी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाचे अधिकृत पत्र सुपूर्द केले.

प्रमुख मागण्या ज्यावर निर्णय झाला:

  • घरकुल योजना: पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देणे.
  • पांदण रस्ते: शिवरस्ते व पांदण रस्ते मोजणी करून अतिक्रमण मुक्त करणे.
  • पाणी पुरवठा: जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे १५ दिवसांत पूर्ण करणे.
  • वीज प्रश्न: ३३/११ केव्ही उपकेंद्रातून शेती पंपांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करणे.
  • बँक व रेशन: संजय गांधी निराधार योजनेचे थकीत अनुदान वाटप आणि रेशन कार्ड संदर्भात विशेष कॅम्पचे आयोजन.
    या प्रसंगी सौंदाळाचे सरपंच श्री. शरद आरगडे व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी यावेळी प्रशासनाचे आभार मानले, मात्र मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असेही सूचित केले.

Ad 1
Tags: Natha Shinde
Previous Post

केजचे तहसीलदार आमचे मित्र राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काळी दौ येथे शांतता बैठकीचे आयोजन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काळी दौ येथे शांतता बैठकीचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काळी दौ येथे शांतता बैठकीचे आयोजन

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In