• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांचा राजीनामा; भाजप प्रवेशाची चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी दि. १०. जि.नगरपरिषदेमधील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसचे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि अंतर्गत वादाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात स्पष्ट केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बनसोडे यांनी काँग्रेस (आय) जिल्हा समितीकडे आपला राजीनामा सादर केला. त्यांनी आपल्या पत्रात, “स्थानिक गटबाजीमुळे मी पदाचा मान राखत राजीनामा देत असून पक्ष सोडत आहे,” असे नमूद केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

सिद्धार्थ बनसोडे हे धाराशिव नगरपरिषदेत काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही कार्यरत होते. नगरपरिषदेमध्ये काँग्रेसचे केवळ तीन नगरसेवक उरले आहेत.
दरम्यान, बनसोडे हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, उर्वरित दोन काँग्रेस नगरसेवकही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, 10 एप्रिलपासून धाराशिव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या मजबुतीकरणासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या तोंडावरच बनसोडे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
एकूणच, धाराशिवमधील या राजकीय घडामोडींमुळे आगामी काळात काँग्रेसची स्थिती आणखी कमकुवत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

बेनी बुद्रुक येथे २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; आकस्मिक मृत्यूची नोंद

Next Post

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय!

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय!

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसच्या कविता पाटील यांचा दणदणीत विजय!

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In