• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
930
VIEWS
Ad 1
Ad 1

तामिळनाडू नंतर नंदुरबारमध्ये पोलिस कोठडीत अमानुष मारहाण,वडिलांची हत्या प्रकरणाच्या निकालाकडे लक्ष

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अक्राणी प्रतिनिधी: नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाणे नंदुरबारचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक ,अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ६१(२) अन्वये हत्येचा कट रचला,कलम १०९(१) अन्वये हत्येचा प्रयत्न ,जीव घेण्याचा प्रयत्न, खून करण्याचा प्रयत्न, कलम १९० अन्वये एकापेक्षा अधिक जणांनी म्हणजेच पोलिस अधिकाऱ्यांनी जमाव मिळून हत्येचा कट रचला व हत्येचा प्रयत्न केला अशा गुन्ह्याची नोंद कु.अ.नहार मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयात दिनांक ३०/०९/२०२५ रोजी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपी पोलिसांना मृत्यूदंड, जन्म ठेपेची शिक्षा किंवा दहा वर्षे किंवा त्याहून अधिक सक्त मजूरीची शिक्षा होऊ शकते


सुशिलकुमार पावरा यांना दिनांक २४/०९/२०२५ रोजी रात्री ००.३० वाजता झोपलेले असताना घरात घुसून पोलिसांनी बळजबरीने अटक करून बॅडमिंटन हॉल पोलिस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे आणले.तेथे बोसडीके ,चीफ अशी अश्लील व वाईट शिवीगाळ करून पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला १४२ आरोपींसमोर मारण्यासाठी हात उगारला, मारण्याचा प्रयत्न केला.याला वेगळं ठेवा व शहर पोलिस ठाणे नंदुरबार येथे मारायला घेऊन जा.असे सांगितले.दिनांक २६/०९/२०२५ रोजी रात्री ९.३० वाजता गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार येथे

मला अमानुषपणे मारहाण करण्यात आली.जातीवाचक,वाईट व अश्लील शिवीगाळ करून पोलिसांच्या विरोधात विडीओ बनवतो का, वर्षा लहाडेंच्या विरोधात आंदोलन करतो का? खैरवे भडगांव येथील पोलिस पाटील विरोधात तक्रार करतो का? तुला मारायला आमदार, खासदार,अधिका-यांची रिक्वेस्ट आलेली आहे,पोलिसांना जजपेक्षा जास्त पॉवर असतो,एकाने माझ्या विरोधात तक्रार दाखल केली होती,त्याला मी तडीपार करून टाकले होते,तुलाही तडीपार करून टाकीन, यापुढे तक्रार केली तर याद राख, मारून टाकीन अशी धमकी देत अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी अमानुषपणे मारहाण केली.तुझ्या आईवर चढायला आलो होतो का? म्हणून पोलिसांच्या विरोधात विडीओ बनवतो,अशी वाईट व अश्लील शिवीगाळ केली.पोलीस निरीक्षक निलेश देसले विरुद्धची तक्रार मागे का घेतली नाही?तुझी आम्ही वाटच बघत होतो,तू कोठे अडकतो, असे म्हणत हेमंत पाटील पोलिस निरीक्षक यांनी अमानुषपणे मारहाण केली.मारहाण ठिकाणी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, हेमंत पाटील व हेमंतकुमार पाटील हे उपस्थित होते. सुशिलकुमार पावरा यांना ८ तास वैद्यकीय उपचार केल्यानंतर मेडिकल रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे.


पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला.मी पोलिसांच्या विरोधात तक्रार मागे घेत नाही म्हणून माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली,त्या हत्येमागे याच पोलिस अधिकाऱ्यांचा हात आहे.आपल्या पदाचा,वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून माझ्या सारख्या अनेक निरपराध व्यक्तींवर यांनी अत्याचार केला आहे.माझे मारहाणीचे प्रकरण दडपण्यासाठी यांनी मला पुन्हा जबरदस्तीने रात्री घरातून अटक करायला लावली,खोटा व बनावट गुन्हा बनवला. डॉक्टराला पैसे देऊन, मॅनेज करून मारहाणीचा मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी श्रवण दत्त यांनी भ्रष्ट काम केले. भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे ,खैरवे भडगांव येथील पोलिस पाटीलची तक्रार, पोलिस निरीक्षक निलेश देसले विरोधातली तक्रार, आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधातली तक्रार,जय वळवी हत्याकांड मध्ये पोलिसांच्या सहभागविषयी शंका,पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना पदावरून हटविण्याची मागणी, या विषयांना धरून पूर्व नियोजित पणे मला अमानुषपणे मारहाण करून संपवण्याचे काम या ४ पोलिस अधिकाऱ्यांनी केले. तामिळनाडू मध्ये पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून मृत्यू प्रकरणी न्यायालयाने ९ पोलिसांना मृत्यूदंड ची शिक्षा सुनावली.त्याच पद्धतीची कठोर शिक्षा सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत मारहाण प्रकरणात व वडिलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचा हात असल्याच्या संशयावरून पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

कर्जत जामखेडमधील ३४३ शाळा डिजिटल प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून शैक्षणिक साहित्याचे वाटप..

Next Post

देवगाव रंगारी घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद; १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

देवगाव रंगारी घरफोडी प्रकरणातील आरोपी जेरबंद; १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In