• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विप्र समाजात ‘रोटी-बेटी व्यवहार’ सुरू व्हावा – रामकिशनजी (दडू) पुरोहित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
विप्र समाजात ‘रोटी-बेटी व्यवहार’ सुरू व्हावा – रामकिशनजी (दडू) पुरोहित
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

विप्र फाउंडेशन शाखा जालना तर्फे रामकिशनजी पुरोहित व बंकटलालजी खंडेलवाल यांचा सत्कार

जालना (प्रतिनिधी) – विप्र फाउंडेशन शाखा जालना तर्फे समाजात एकता व समरसता मजबूत करण्याच्या उद्देशाने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नांदेड येथील ऑल इंडिया पारिक महासभा (महाराष्ट्र-गोवा) चे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया टेंट असोसिएशनचे अध्यक्ष, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रणी कर्मयोगी रामकिशनजी (दडू) पुरोहित यांचे जालना आगमनानिमित्त हॉटेल मधुबन येथे शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला।
आपल्या भाषणात रामकिशनजी पुरोहित यांनी समाजातील एकतेवर भर देत सांगितले की, सध्याच्या काळात समाज संघटित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः विप्र समाजातील युवक-युवतींच्या विवाहाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ‘रोटी-बेटी व्यवहार’ वाढविण्याची गरज आहे, ज्यामुळे परस्पर संबंध दृढ होतील व समाजात बंधुभाव वाढेल.
त्यांनी सांगितले की, नांदेड येथे यावर्षी त्यांच्या प्रयत्नांमुळे विप्र समाजातील दोन विवाह यशस्वीरीत्या पार पडले असून ही एक प्रेरणादायी सुरुवात आहे. तसेच त्यांनी गुरुवर्य आदरणीय गोविंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करून समाजातील ज्येष्ठांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

याच कार्यक्रमात विप्र फाउंडेशन जालना चे मार्गदर्शक बंकटलालजी खंडेलवाल यांची विप्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला।
कार्यक्रमादरम्यान समाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भक्तमाल कथा प्रवक्ता किशोरजी तिवारी, विप्र फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर झोनचे अध्यक्ष रामनिवास गौड, विभागीय संघटन महामंत्री पवन जोशी, सचिव पंडित विजयकुमार व्यास, युवा अध्यक्ष परीक्षेत शर्मा तसेच नारायण दायमा, विशाल शर्मा, दिलीप गौड, सुरेश शर्मा, भगवान दायमा, हितेश जोशी, शैलेश व्यास, चेतन पारिक, अमरीश ओझा, सत्यनारायण जोशी, अशोक पुरोहित, दिनेश जोशी, प्रतीक पुरोहित, रोहित गौड, तन्मय जोशी आदी मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा व भविष्यात अशा सकारात्मक उपक्रमांना पुढे नेण्याचा संकल्प करून करण्यात आला.

Ad 1
Tags: Pandi Vyas
Previous Post

शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी; पुतळा परिसरात विद्युत रोषणाईत वाढ.

Next Post

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू; हिंगणी गावात शोककळा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
सर्पदंशाने युवकाचा मृत्यू; हिंगणी गावात शोककळा

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू; हिंगणी गावात शोककळा

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In