• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in क्राईम
0
नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी
0
SHARES
40
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदेड / प्रतिनिधी :
नांदेडमध्ये ६ एप्रिल रोजी घडलेल्या शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकर (वय ३५) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून, या हत्येमागे प्रेयसीची आईच सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील श्रीनगर भागात पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सोनू कल्याणकर यांच्यावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले होते.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जुन्या प्रेमसंबंधातून हा खून घडवून आणण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून इंदुबाई मंगनाळे या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, सोनू कल्याणकर यांचे सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. संबंधित तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरवले असताना सोनू यांनी ते लग्न मोडल्याचा राग कुटुंबीयांच्या मनात होता. याच सूडातून इंदुबाई मंगनाळे यांनी कट रचून मारेकऱ्यांना लाखो रुपयांची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे.

तपासादरम्यान, “जोपर्यंत सोनू मरणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी आपल्या मुलाच्या मित्राकडे केल्याची माहितीही समोर आली आहे.

सुरुवातीला या प्रकरणात संबंधित तरुणीच्या भावावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पुढील तपासात वेगळेच वास्तव समोर आले. आरोपी महिलेचा मुलगा कुख्यात गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून सध्या कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, २०२१ मध्येही याच वादातून सोनू कल्याणकर यांच्यावर गोळीबार झाला होता. त्या वेळी ते बचावले होते. अखेर जुन्या वैमनस्यातूनच त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Ad 1
Tags: Sheikh Moien
Previous Post

“रोग जवळ येणे म्हणजे कर्माचे फळ” – ह.भ.प. दिगंबर गाडे यांचे प्रतिपादन

Next Post

किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
115
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
94
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
20
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
12
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
110
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
12
Next Post
किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In