• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in Blog
0
किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी) : किनवट शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

जयंतीचा मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पार पडला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. अनिल उमरे व महेंद्र नरवाडे यांनी सामुदायिक वंदना घेतली. आमदार भीमराव केराम यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.

RelatedPosts

पिंपरी-चिंचवड हादरले! हुंडाबळी प्रकरणातील शिल्पा गवारे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना कठोर कारवाईची ग्वाही

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

यावेळी विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. ॲड. दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. सुनिल येरेकार यांनी खिचडी व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. नगरसेविका ललिता मुनेश्वर यांनी बुंदी लाडू तर गुरुस्वामी पवार यांनी शीतपेयांचे वाटप केले. काही कार्यकर्त्यांनी मठ्ठ्याचेही वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

बसस्थानकात आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते, तर जेतवन बुद्ध विहारात नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे निखिल सर्पे, आकाश सर्पे, अनिकेत भरणे, सिद्धार्थ भरणे, ऑलफ्रेंड ठमके, संघर्ष घुले, अनिल कांबळे आदींनी पुढाकार घेतला.

Previous Post

नांदेडमध्ये शिवसेना कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा; प्रेयसीच्या आईनेच दिली सुपारी

Next Post

अंबरनाथमध्ये नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन

Related Posts

Blog

पिंपरी-चिंचवड हादरले! हुंडाबळी प्रकरणातील शिल्पा गवारे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना कठोर कारवाईची ग्वाही

August 29, 2026
0
मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
Blog

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

August 29, 2026
0
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन
Blog

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

August 29, 2026
4
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहनमानवत प्रतिनिधी३० ऑगस्टला परभणीत शेतकरी-कार्यकर्ता मेळावा; रखडलेल्या विकासकामांवरही होणार चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी दौऱ्यावर
Blog

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी परभणी दौऱ्यावर

August 29, 2026
1
मानवत येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश; ११५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मानवत येथे रक्तदानातून मानवतेचा संदेश; ११५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 29, 2026
1
Next Post
अंबरनाथमध्ये नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन

अंबरनाथमध्ये नाल्यातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड हादरले! हुंडाबळी प्रकरणातील शिल्पा गवारे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना कठोर कारवाईची ग्वाही

August 29, 2026
मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

August 29, 2026
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

August 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In