• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्ञानसाधनेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
ज्ञानसाधनेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

चंदगड (प्रतिनिधी) : दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्ञानसाधनेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन आणि अभ्यासाची प्रेरणा देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन अॅड. एन. एस. पाटील होते. त्यांच्या हस्ते विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

यावेळी अॅड. पाटील म्हणाले, “एखाद्या गोष्टीचे वेड घेतल्याशिवाय यश मिळत नाही. डॉ. आंबेडकरांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत. वाचनाची सवय लावल्यास अज्ञानातून मुक्ती मिळू शकते.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे व खजिनदार अनंत सुतार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य आर. पी. पाटील यांनी प्रास्ताविकातून बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली.

लेखक संजय साबळे यांनी “वाचन हा प्रगतीचा पाया असून विद्यार्थीदशेतच वाचनाची सवय लागणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. तसेच ज्येष्ठ संचालक प्रा. आर. पी. पाटील यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक कार्याचा आणि ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशाचा विद्यार्थ्यांवर होणारा प्रभाव अधोरेखित केला.

कार्यक्रमात ग्रंथपाल शरद हदगल यांनी डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे विशेष पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल, प्रा. ए. व्ही. धायगुडे, प्रा. एस. एम. शेख, जे. जी. पाटील, व्ही. के. गावडे, टी. व्ही. खंदाळे यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. सी. शिगांडे यांनी केले, तर उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी आभार मानले.

ज्ञान, विचार आणि वाचन संस्कृतीला चालना देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Ad 1
Previous Post

व्यंकटराव शिक्षण संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमले आजरा; विराट हिंदू संमेलनात जनसागर

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

October 13, 2026
10
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
18
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post
हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमले आजरा; विराट हिंदू संमेलनात जनसागर

हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमले आजरा; विराट हिंदू संमेलनात जनसागर

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In