• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलमध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण; नगरसेविका छाया दाभाडे यांचा सामाजिक उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
एरंडोलमध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण; नगरसेविका छाया दाभाडे यांचा सामाजिक उपक्रम
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) : शहरातील गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने प्रभाग क्रमांक ३ च्या नगरसेविका छाया दाभाडे यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील व सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर होते.

नगरसेविका छाया दाभाडे यांनी आपल्या पती आनंद दाभाडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाबद्दल शहरभर समाधान व्यक्त होत आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी मृणाल पाटील यांनी दाभाडे दांपत्याच्या या उपक्रमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित होत असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना तातडीने उपचारासाठी नेणे सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नमूद केले.

नगरसेविका छाया दाभाडे यांनी पालिका निवडणुकीवेळी दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, उपनगराध्यक्षा सुनीता माळी, नगरसेवक अनिल महाजन, रवींद्र महाजन, अमोल तंबोली, मयूर महाजन, कृष्णा ओतारी, योगेश महाजन, नगरसेविका आरती महाजन, पौर्णिमा देवरे, कमल पाटील, डॉ. गितांजली ठाकूर, सत्यभामा पाटील, मनकर्णा चौधरी, कल्पना पाटील, माजी नगरसेवक रुपेश माळी, अतुल महाजन, बबलू चौधरी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमासाठी माजी नगरसेवक पापा दाभाडे, सुरेश दाभाडे, तसेच मरीमाता चौक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे शहरातील आरोग्यसेवेतील अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Ad 1
Tags: Tushar Shimpi
Previous Post

आजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माणुसकीचा उपक्रम; प्रवाशांना थंड पाणी व जिलेबी वाटप

Next Post

शितल अकॅडमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शितल अकॅडमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

शितल अकॅडमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In