• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राणीसावरगाव येथे दोन प्राचीन शिलालेखांचा शोध; केदारेश्वर महादेव मंदिर दानशिलालेख उजेडात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
राणीसावरगाव येथे दोन प्राचीन शिलालेखांचा शोध; केदारेश्वर महादेव मंदिर दानशिलालेख उजेडात
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी (प्रतिनिधी)

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मौजे राणीसावरगाव येथे दोन प्राचीन शिलालेख सापडल्याने ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. यातील एक शिलालेख केदारेश्वर महादेव मंदिराशी संबंधित “दानशिलालेख” असून तो गावाच्या दक्षिणेला केदार तांडा–घाटवडी रस्त्यालगत एका शेताच्या बांधावर आढळून आला आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

हा शिलालेख चौकोनी शिळेवर कोरलेला असून तो दोन भागांत विभागलेला आहे. एक बाजूला चार ओळी तर दुसऱ्या बाजूला तीन ओळींचा मजकूर देवनागरी लिपीत मराठी भाषेत कोरलेला आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षे उघड्यावर असूनही शिलालेखाची झीज अत्यल्प असून त्याचे अक्षर आजही स्पष्ट व सुबक स्थितीत आहे.

शिलालेखाच्या वरच्या भागात मंगल कलश, सूर्य-चंद्र, नंदी आणि दुसऱ्या बाजूस गाढवाची कोरीव प्रतिमा आढळते. या शिलालेखात केदार सोमनाथ देवाला तेलघाणा (घाणे), मळा आणि शेतजमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. तसेच दान केलेल्या संपत्तीवर अतिक्रमण करणाऱ्यांसाठी शापवाचक इशारा देण्यात आला आहे.

संशोधकांच्या मते, हा शिलालेख केवळ धार्मिक नसून त्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. मंदिरांना तेलघाणा व शेतजमीन दान देणे म्हणजे नित्य पूजा, दिवाबत्ती व व्यवस्थापनासाठी आर्थिक स्थैर्य देणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. तसेच मंदिर हे त्या काळात धार्मिक केंद्रासोबतच आर्थिक संस्थाही असल्याचे यावरून दिसून येते.

या शिलालेखात “कदंब” नावाच्या स्थानिक अधिकाऱ्याचा उल्लेख असून, त्याकाळी स्थानिक प्रशासन व मंदिर व्यवस्थापन यांचा घनिष्ठ संबंध असल्याचेही स्पष्ट होते. दान केलेली जमीन करमुक्त असल्याचे संकेतही यातून मिळतात.

शिलालेख वाचन व संशोधनाचे काम अनिल किसन दुधाणे व अथर्व पिंगळे यांनी केले असून, प्रा. अनिल स्वामी, प्रा. डॉ. अविनाश खोकले, प्रा. हनुमान व्हरगुळे यांसह अनेकांनी सहकार्य केले.

या शोधामुळे राणीसावरगाव परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाला नवी ओळख मिळाली असून पुढील संशोधनासाठी ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

ज्ञानोपासक विद्यालय, रामेटाकळी येथे विद्यार्थिनीचा आदर्श उपक्रम; वाढदिवसानिमित्त संविधानाची प्रत भेट

Next Post

मौजे पाले (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 119 रुग्णांची तपासणी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
मौजे पाले (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 119 रुग्णांची तपासणी

मौजे पाले (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 119 रुग्णांची तपासणी

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In