• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून कट रचत पत्नीसह तिघे जेरबंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून कट रचत पत्नीसह तिघे जेरबंद
0
SHARES
57
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : लाडलेसाब नदाफ

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

तुळजापूर :तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे 36 वर्षीय कृष्णा आनंद साठे यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडवली होती. सुरुवातीला गूढतेचे आवरण असलेल्या या प्रकरणाचा पोलिसांनी अत्यंत शिताफीने आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर थरारक उलगडा केला आहे. या हत्येमागे प्रेमसंबंध, विश्वासघात आणि पूर्वनियोजित कट असल्याचे निष्पन्न झाले असून मयताच्या पत्नीचा सहभाग समोर आल्याने प्रकरण अधिकच धक्कादायक बनले आहे.

या तपासात पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे तसेच पोलीस हवालदार महादेव राऊत व जी. बी. वागुलकर यांच्या पथकाने वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाई करत तपासाची दिशा स्पष्ट केली.

घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा, फॉरेन्सिक तपास, श्वान पथकाचा वापर, सीसीटीव्ही फुटेजची छाननी आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर यामुळे गुन्ह्याची साखळी उलगडत गेली. 14 एप्रिल रोजी सायंकाळी “गावात जाऊन येतो” असे सांगून घराबाहेर पडलेले कृष्णा साठे हे मुख्य आरोपी शुभम मल्लिकार्जुन घाटोळे याच्या जाळ्यात अडकले.

आरोपीने मोटरसायकलवरून शेतात नेल्यानंतर “तुझी पत्नी मला आवडते, तू आमच्यात अडथळा आहेस” असे सांगत लाकडाच्या ओंडक्याने डोक्यावर प्रहार करून निर्दयीपणे हत्या केली. जीव वाचवण्यासाठी केलेल्या आर्त विनवण्यांकडे दुर्लक्ष करत आरोपीने काही क्षणांतच त्यांचा जीव घेतला.

हत्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह शेतातील बैलांच्या कोठ्यात लपवून ठेवला. त्यानंतर पोत्यात भरून टमटम चालकाच्या मदतीने मृतदेह मंगरूळ-तुळजापूर मार्गावरील पुलाजवळ आणून 30 ते 40 मीटरपर्यंत फरपटत नेऊन टाकण्यात आला. चालकाला धमकावत गप्प बसण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे.

तपासादरम्यान सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने “काम ओके झाले” असा संदेश मयताच्या पत्नीला दिल्याचे उघड झाले. यावरून ही हत्या पूर्णपणे पूर्वनियोजित आणि संगनमताने रचल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे संशयितांचा घेरा आवळला.

कसून चौकशीनंतर मयताची पत्नी प्रतिभा कृष्णा साठे, मुख्य आरोपी शुभम घाटोळे आणि पार्थ देशमुख यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार बळीराम शिंदे आणि अमोल निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुराव्यांच्या आधारे प्रभावी चौकशी करत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

मंगरूळसह संपूर्ण तुळजापूर तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. पोलिसांनी मात्र अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

या कारवाईतून पोलिसांची तपासातील धार, तांत्रिक कौशल्य आणि समन्वय स्पष्टपणे दिसून आला आहे. कितीही चलाखीने गुन्हा केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

प्रसन्ना देसाई यांना जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान.

Next Post

🎉 पट्टण कोडोलीत सरपंचपदी सौ. वर्षा बर्डे यांची बिनविरोध निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post
🎉 पट्टण कोडोलीत सरपंचपदी सौ. वर्षा बर्डे यांची बिनविरोध निवड

🎉 पट्टण कोडोलीत सरपंचपदी सौ. वर्षा बर्डे यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In