• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालकमंत्री सरनाईकांच्या आदेशान्वये अजय पाटील यांचे येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात६२ लाख ६६ हजारांची घसघशीत वाढ.!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
पालकमंत्री सरनाईकांच्या आदेशान्वये अजय पाटील यांचे येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात६२ लाख ६६ हजारांची घसघशीत वाढ.!
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

धाराशिव दि.१७ (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धाराशिव विभागाच्यावतीने येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी भाविकांच्या सेवेसाठी धाराशिव, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब व परंडा या आगारातून १२४ बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावल्या. दि.१ ते ५ एप्रिल दरम्यान १ हजार ३६८ बसच्या फेऱ्या करण्यात आल्या. या माध्यमातून विभागाला ६२ लाख ६६ हजार ५७८ रुपये उत्पन्न झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी दिली आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या यात्रेसाठी लाखो भाविक दरवर्षी दर्शन घेण्यासाठी येरमाळा नगरीत दाखल होत असतात. या यात्रे दरम्यान भाविकांची प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार धाराशिव विभाग नियंत्रक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक यांच्याशी समन्वय साधून नियोजन केले. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुकर आणि सोयीचा करून दिला. या माध्यमातून एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही देखील घसघशीत भर पडली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धाराशिव विभागाने १ एप्रिल ते ५ एप्रिल या कालावधीत खास भाविकांच्या सोयीसाठी विशेष प्रवास बससेवा राबवली. या कालावधीत धाराशिव, उमरगा, तुळजापूर, कळंब, भूम आणि परंडा या आगारांतून एकूण १२४ बस चालवण्यात आल्या. या बसेनी १३६८ फेऱ्या पूर्ण केल्या. त्यासाठी १० लाख ९३ हजार ३१० किलो मीटर अंतर पार केले. यात्रे दरम्यान १ लाख ४१ हजार ९५५ प्रवाशांनी एसटीचा प्रवास करत एकूण ६२ लाख ६६ हजार ९७८ रुपयांचे उत्पन्न मिळाली आहे. योग्य नियोजन केल्यामुळे यात्रे कालावधीत एका देखील भाविकाला वाहतुकीची अडचण भासली नाही.


विशेष म्हणजे, तुळजापूर आणि कळंब आगारांनी सर्वाधिक फेऱ्या आणि उत्पन्न मिळविले आहे. तर धाराशिव आगारातून सर्वाधिक बस सोडण्यात आल्या. यात्रेत लाखो भाविकांची गर्दी असताना देखील शिस्तबद्ध नियोजनामुळे वाहतूक व्यवस्थेवर कोणताही ताण जाणवला नाही किंवा वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली नाही. विशेष म्हणजे नियमितपणे सर्व बसेस भाविकांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करीत होत्या. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसटी अधिकाऱ्यांनी केवळ प्रवाशांची गैरसोय टाळण्यावरच भर दिला नाही, तर एसटीच्या उत्पन्न वाढीकडेही विशेष लक्ष केंद्रित केले. जादा बसची कार्यक्षम नियोजनबद्ध रचना केल्यामुळे उत्पन्नात भर पडली. पालकमंत्री सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग नियंत्रक पाटील यांनी केलेल्या अंमलबजावणीमुळे एसटी महामंडळाने हे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे यात्रेच्या काळात वाहतूक व्यवस्थित पुरवणारी यंत्रणा फक्त एसटी महामंडळात व्यवस्थितपणे पुरवू शकते हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

आगार निहाय बसची संख्या, बसच्या एकूण फेऱ्या, कापलेले अंतर किलो मीटरमध्ये, मिळालेले उत्पन्न व प्रवासी संख्या पुढील प्रमाणे – धाराशिव आगार एकूण बस संख्या २२, एकूण केलेल्या फेऱ्या १८६, कापलेले अंतर ११८२३ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न ८०४८३८ रुपये व प्रवासी संख्या – १२०८७, उमरगा आगार एकूण बस संख्या ७, एकूण फेऱ्या ४४, कापलेले एकूण अंतर ६२३२ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न ३२६४५९ रुपये व ३६५१ प्रवासी संख्या तसेच भूम आगार एकूण बस संख्या – २१, एकूण केलेल्या बस फेऱ्या – २२८, कापलेले अंतर – १५१११ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १०८८४० रुपये व प्रवासी संख्या – १३८६९ तर तुळजापूर आगार एकूण बस संख्या – २४, एकूण बस फेऱ्या – ३७०,

एकूण कापलेले अंतर २८७५४ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १५१८४३८ रुपये व प्रवासी संख्या – २४६९९ तर कळंब आगार एकूण बस संख्या – २४, एकूण केलेल्या फेऱ्या – २६५, कापलेले अंतर – ३०१४१ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – १७३३४८७ रुपये व २४६७१ प्रवासी संख्या आणि परंडा आगार बसची संख्या – २०, एकूण केलेल्या फेऱ्या – २७५, एकूण कापलेले अंतर – १७३२२ किलो मीटर, मिळालेले उत्पन्न – ९७४५१६ रुपये व प्रवासी संख्या – १६१३७ अशा एकूण १२३ बसेस विभागातून यात्रेसाठी धावल्या असून त्यांनी १ हजार ३६८ यात्रेसाठी प्रवास फेऱ्या मारल्या तर १ लाख ९ हजार ३९० किलो मीटर अंतर कापले तसेच एकूण मिळालेले उत्पन्न – ६२ लाख ६६ हजार ५७८ रुपये आणि ९४ हजार ११४ प्रवाशांनी यात्रेसाठी हजेरी लावली. एकंदरीतच येडेश्वरी देवी एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नासाठी पावली असल्याचे चित्र दिसत आहे.

Tags: Vikas Wagh
Previous Post

महापुरुषांचे विचार व शिकवण प्रत्यक्ष आमलात आणने हिच खरी आदरांजली : रणजित राऊत

Next Post

आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव ‘भीममय’

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
13
Next Post
आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव ‘भीममय’

आदर्श शिंदेंच्या पहाडी सुरांनी धाराशिव 'भीममय'

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In