• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समता चळवळीतील झुंजार नेतृत्व चक्रधर दादा उगले अनंतात विलीन; अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
समता चळवळीतील झुंजार नेतृत्व चक्रधर दादा उगले अनंतात विलीन; अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

पाथरी (प्रतिनिधी):
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पश्चिम मराठवाडा विभागीय अध्यक्ष चक्रधर दादा उगले यांच्या अकाली निधनाने परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. समता, सामाजिक न्याय आणि बहुजनांच्या हक्कांसाठी लढणारे एक झुंजार व निष्ठावान नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथील रहिवासी असलेल्या उगले यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर नेतृत्व उभे केले. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पंचायत समिती सभापती तसेच दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य या जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. तळागाळातील प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत समाजकारणात वेगळी छाप पाडली.

RelatedPosts

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा ठसा त्यांच्या कार्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. समता, न्याय आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी बहुजन समाजासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावर मोठा जनसंपर्क निर्माण झाला होता.

दरम्यान, पुणे येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना समता परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सिमुरगव्हाण येथील त्यांच्या फार्महाऊसवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. हजारोंच्या जनसमुदायाने अंत्ययात्रेत सहभाग नोंदवत आपल्या लाडक्या नेत्याला अश्रूभिनीत निरोप दिला. सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवघ्या ५२ व्या वर्षी त्यांनी घेतलेला निरोप समाजमनाला चटका लावणारा ठरला असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व मोठा आप्तपरिवार आहे. समता चळवळीतील त्यांचे कार्य आणि समाजासाठीची त्यांची निष्ठा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Previous Post

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचा संताप वाढला

Next Post

व्यवसाय शिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे विद्यार्थ्यांची झेप; गुगळी धामणगाव शाळेचा आदर्श उपक्रम

Related Posts

ताज्या घडामोडी

पिंपोडे विकास सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध निवड

July 22, 2026
89
ताज्या घडामोडी

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

July 22, 2026
36
ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
5
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
16
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
5
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
3
Next Post
व्यवसाय शिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे विद्यार्थ्यांची झेप; गुगळी धामणगाव शाळेचा आदर्श उपक्रम

व्यवसाय शिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे विद्यार्थ्यांची झेप; गुगळी धामणगाव शाळेचा आदर्श उपक्रम

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In