• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टाकाऊ वस्तूंना नवजीवन; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपण्याची सृजनशील जाणीव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in Blog
0
टाकाऊ वस्तूंना नवजीवन; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपण्याची सृजनशील जाणीव
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

चंदगड : प्रतिनिधी

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज येथे सुरू असलेल्या उन्हाळी संस्कार शिबिरात “टाकाऊपासून टिकाऊ” या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. पर्यावरणप्रेमी अध्यापिका सौ. सुजाता कोरवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंना सर्जनशीलतेच्या जोरावर नवजीवन दिले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर प्राचार्य आर. पी. पाटील यांनी स्वागत करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सृजनशीलता विकसित होते, असे मत व्यक्त केले.

मार्गदर्शन करताना सौ. सुजाता कोरवी यांनी वाढते प्रदूषण आणि प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. “पर्यावरण संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली. प्लास्टिक बॉटल, सुतळी, कप, ग्लास यांसारख्या टाकाऊ वस्तूंमधून शोभिवंत व उपयुक्त वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून आकर्षक वस्तू तयार केल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील विचारसरणी विकसित झाली असून टाकाऊ वस्तूंविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक बनला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यशाळेत सुमारे ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. व्ही. जे. डोंगरे यांनी केले.

एकूणच, हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरला असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षण चळवळीला अधिक बळ मिळणार आहे.

Previous Post

‘हिवतापमुक्त गाव, निरोगी समाज’; वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात

Next Post

धानोरा गावच्या प्रथम सुनबाईची पोलिस दलात भरारी; पुनम मोरे यांची ठाणे शहर पोलीस शिपाईपदी निवड

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
धानोरा गावच्या प्रथम सुनबाईची पोलिस दलात भरारी; पुनम मोरे यांची ठाणे शहर पोलीस शिपाईपदी निवड

धानोरा गावच्या प्रथम सुनबाईची पोलिस दलात भरारी; पुनम मोरे यांची ठाणे शहर पोलीस शिपाईपदी निवड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In