• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘हिवतापमुक्त गाव, निरोगी समाज’; वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘हिवतापमुक्त गाव, निरोगी समाज’; वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

वाटंगी (प्रतिनिधी) : “हिवतापमुक्त गाव आणि निरोगी समाज” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी व अंतर्गत सर्व उपकेंद्रांमध्ये जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आरोग्य विभागाकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.

या दिनानिमित्त गावोगावी जनजागृती रॅली, स्वच्छता अभियान, प्रबोधन सभा तसेच हिवताप (मलेरिया) प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हिवताप हा संक्रमित ॲनोफिलीस मादी डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार असून त्याची लक्षणे, उपचार व प्रतिबंध याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

आरोग्य विभागाने नागरिकांना ताप, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा व अंगदुखी ही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. तसेच घर परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी नष्ट करणे, मच्छरदाणीचा वापर करणे यांसारख्या उपाययोजनांवर भर देण्यात आला.

गावपातळीवर कंटेनर तपासणी मोहीम राबवून पाण्याच्या टाक्या, कुलर, टायर, फुलदाण्या यांची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान तसेच आरोग्य सेवकांनी गावपातळीवर जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. आशा स्वयंसेविका, युवक मंडळे व ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

पाखंड खंडनाचे कार्य वारकरीच करू शकतो; शेळप येथे पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न

Next Post

टाकाऊ वस्तूंना नवजीवन; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपण्याची सृजनशील जाणीव

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
11
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
टाकाऊ वस्तूंना नवजीवन; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपण्याची सृजनशील जाणीव

टाकाऊ वस्तूंना नवजीवन; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपण्याची सृजनशील जाणीव

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In