• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेटरचा मृत्यू; ‘घात की अपघात?’ चर्चेला उधान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
कंस्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ऑपरेटरचा मृत्यू; ‘घात की अपघात?’ चर्चेला उधान
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी)

माहूर तालुक्यातील जुनापाणी नजीक असलेल्या शारदा कंस्ट्रक्शन कंपनीच्या साईटवर अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, झोपलेल्या एका निष्पाप ऑपरेटरचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा प्रकार घात की अपघात, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड राज्यातील जोंगी (ता. चंदवारा, जि. कोंडरमा) येथील अजीत यादव (वय ३५) हा संबंधित साईटवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या म्हणण्यानुसार, मागील दहा दिवसांपासून कंपनीकडून डिझेल बचतीसाठी जनरेटर बंद ठेवण्यात येत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईट व पंख्यांची सुविधा नसल्याने मजुरांना उघड्यावर झोपावे लागत होते.

दि. १ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजता अजीत यादव मोकळ्या जागेत झोपला असताना, त्याच ठिकाणी मातीने भरलेले टिप्पर येऊन माती टाकण्यात आली. दुर्दैवाने, ही माती थेट त्याच्यावर पडल्याने तो ढिगाऱ्याखाली दबला. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही.

दि. २ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास जेसीबीद्वारे माती हलविताना अजीत यादव याचे पाय दिसून आल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर माहूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत नातेवाईक येण्याची प्रतीक्षा सुरू असल्याने शवविच्छेदन प्रक्रिया विलंबित होती.

या प्रकरणात अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नसून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, प्राथमिक माहिती व परिस्थितीवरून हा प्रकार गंभीर निष्काळजीपणाचा असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. साईटवर माती नेमकी कशासाठी आणली जात होती, ती रात्रीच का टाकली जात होती, रस्त्याच्या कामासाठी मुरमाऐवजी मातीचा वापर का करण्यात येत होता, अशा प्रश्नांची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे, केवळ खर्च वाचवण्यासाठी जनरेटर बंद ठेवणे आणि त्यातून एका कामगाराचा जीव जाणे, ही बाब संतापजनक असल्याची प्रतिक्रिया मजूर व स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

Next Post

एमआयपी ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल ९५.३१%

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

एमआयपी ज्युनियर कॉलेजचा बारावीचा निकाल ९५.३१%

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In