• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादाच्या सात वर्षीय प्रनिका पाटीलची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादाच्या सात वर्षीय प्रनिका पाटीलची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 03 (प्रतिनिधी):
शहादा येथील अवघ्या सात वर्षीय प्रनिका पाटील हिने आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. नंदुरबार जिल्हा चेस सर्कल यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत तिने घवघवीत कामगिरी करत पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

ही स्पर्धा स्थानिक इंदुबाई गोसावी वाचनालयात पार पडली असून जिल्ह्यातील ४४ खेळाडूंनी विविध गटांत सहभाग नोंदवला होता. स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत ७ वर्षांखालील गटात चुरशीचे सामने रंगले. प्रनिकाने संयम आणि कौशल्य दाखवत चारही डाव जिंकून निर्विवाद यश संपादन केले.

RelatedPosts

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

प्रनिका ही शहादा येथील शल्यचिकित्सक डॉ. प्रफुल्ल पाटील यांची कन्या असून, औरंगपूर येथील प्रगतीशील शेतकरी सुरेश पाटील यांची नात आहे. अल्पवयातच मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी डॉ. नरेंद्र गोसावी, संगीता लखोटीया व सुभाष मोरावकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मुख्य पंच म्हणून संदीप साळुंके यांनी काम पाहिले, तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ऋषिकेश सोनार, दीपक लाखोटीया आणि सोनाली जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रनिकाच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढला असून पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष भौतिकशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न

Next Post

शहादा येथील पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाची निकालात उज्ज्वल कामगिरी कायम

Related Posts

ताज्या घडामोडी

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026
35
ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
14
ताज्या घडामोडी

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

June 18, 2026
18
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
16
ताज्या घडामोडी

“स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

June 18, 2026
0
ताज्या घडामोडी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीत 99.79 टक्के मतदान

June 18, 2026
4
Next Post
शहादा येथील पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाची निकालात उज्ज्वल कामगिरी कायम

शहादा येथील पूज्य साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाची निकालात उज्ज्वल कामगिरी कायम

ताज्या बातम्या

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026

अमरावती जिल्ह्यातील सर्व सीबीएसई व राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासूनच सुरू होणार

June 18, 2026

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In