• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष भौतिकशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
वसंतराव नाईक महाविद्यालयात तृतीय वर्ष भौतिकशास्त्र अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 03 (प्रतिनिधी):
येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष विज्ञान (भौतिकशास्त्र – सत्र सहावे) या वर्गासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुषंगाने एकदिवसीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशुभाऊ जाधव अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. व्ही. साळी, तसेच सदस्य प्राचार्य डॉ. उदय जगताप, प्राचार्य आर. एस. खडायते, प्रा. डॉ. संजय घोष, प्रा. डॉ. अविनाश पाटील, प्रा. डॉ. रवी बावणे, प्रा. डॉ. एस. डी. बागुल, प्रा. डॉ. नितीन बाविस्कर, प्रा. डॉ. प्रिती रावताळे आणि आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बहिणाबाई चौधरी व कै. नानासाहेब यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली.

RelatedPosts

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जे. व्ही. साळी यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, संशोधनाधारित व जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक आहे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्था व आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि संशोधनवृत्ती विकसित करणारा अभ्यासक्रम असावा, असे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी विद्यार्थी-केंद्रित अभ्यासक्रमावर भर देत भौतिकशास्त्रातील सिद्धांत व प्रात्यक्षिक यांचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. हिमांशुभाऊ जाधव यांनी स्पर्धेच्या युगात अभ्यासक्रम अधिक सक्षम व स्पर्धात्मक असावा, असे मत व्यक्त केले.

कार्यशाळेच्या पुढील सत्रात तज्ज्ञांनी पुनर्रचित अभ्यासक्रमाचे सादरीकरण केले व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. ए. सी. चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. राजेश सोनवणे, प्रा. राम हजारी, प्रा. गणेश पडघन यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेस विद्यापीठ परिसरातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; चिकन विक्रीवर परिणाम

Next Post

शहादाच्या सात वर्षीय प्रनिका पाटीलची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026
33
ताज्या घडामोडी

मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह शेतकऱ्याचे बेमुदत आमरण उपोषण

June 18, 2026
14
ताज्या घडामोडी

शेती पंपावरील उपसा बंदी आदेश मागे घ्या; शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी

June 18, 2026
18
ताज्या घडामोडी

इचलकरंजी ते शिरोळ पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरील उपसा बंदी उठवावी; शेतकऱ्यांचे निवेदन

June 18, 2026
16
ताज्या घडामोडी

“स्मार्ट मीटर बसवायचे तर नागपूरपासून सुरुवात करा; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका” — शिवसेना (उबाठा) गटाचा इशारा

June 18, 2026
0
ताज्या घडामोडी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकीत 99.79 टक्के मतदान

June 18, 2026
4
Next Post
शहादाच्या सात वर्षीय प्रनिका पाटीलची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

शहादाच्या सात वर्षीय प्रनिका पाटीलची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्रात ‘आरटीआय नियम २०२६’ लागू

June 18, 2026

अमरावती जिल्ह्यातील सर्व सीबीएसई व राज्य मंडळाच्या शाळा ३० जूनपासूनच सुरू होणार

June 18, 2026

शिरूर नगरपरिषदेचा दिव्यांग सक्षमीकरणाचा पुढाकार; १४० लाभार्थ्यांना १३ लाखांचा निधी

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In