लातूर (प्रतिनिधी) : समर्पण, साधना आणि सेवाभाव यांचे जिवंत प्रतीक मानले जाणारे परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु अप्पाजी यांचा सोनू डगवाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला भक्तगण व मान्यवरांची उपस्थिती लाभली.
परमपूज्य बसवलींग पट्टदेवरु यांनी आपले संपूर्ण आयुष्य बसवेश्वर यांच्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी अर्पण केले आहे. समाजातील सदाचार, समता आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. “कायका आणि दासोह” हा संदेश त्यांनी केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतूनही समाजासमोर ठेवला आहे.
त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तालतपस्वी पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्या हस्ते गुरुग्रंथ प्रदान करून सोनू डगवाले यांनी त्यांचा सन्मान केला व आशीर्वाद घेतला.
या वेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, अशा महान व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन समाजाला सदैव प्रेरणा देत राहो, अशी भावना व्यक्त केली.

