• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या व आंदोलनाबाबत ऑनलाईन सभेचे आयोजन; विजुक्टा गडचिरोलीचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

अहेरी | प्रतिनिधी

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या, शासन धोरणे आणि आगामी आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी विजुक्टा गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव यांनी केले आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

संघटनेच्या निवेदनानुसार, स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी राज्यात १०+२+३ शिक्षण प्रणाली राबविण्यात आली. मात्र, काळानुसार शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल झाले. विशेषतः २००० नंतर “शिक्षण सेवक” संकल्पना आणि विनाअनुदानित शिक्षण पद्धतीमुळे शिक्षकांवर मोठा अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“२५ वर्षे सेवा करूनही पूर्ण अनुदान नाही”

विनाअनुदानित शाळांमध्ये अनेक शिक्षकांनी २५ वर्षांहून अधिक काळ सेवा दिली, तरी आजपर्यंत १०० टक्के अनुदान मिळाले नाही, अशी खंत संघटनेने व्यक्त केली. दुसरीकडे लोकप्रतिनिधींना अल्पकाळात विविध सुविधा आणि पेन्शन मिळते, मात्र शिक्षकांच्या झोळीत मात्र निराशाच पडते, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

शासनाच्या धोरणांवर टीका

२०१२ ते २०२६ या काळात शिक्षण क्षेत्रात अनेक “तुघलकी” शासन निर्णय लागू झाल्याचा आरोप करत संघटनेने ऑनलाईन संचमान्यता प्रणालीसह विविध अटींवर नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी ऑफलाईन पद्धतीने सोपी संचमान्यता दिली जात होती, मात्र आता शिक्षण क्षेत्रावर जाचक अटी लादल्या जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

विजुक्टा केंद्रीय संघटना आणि जिल्हा संघटनांच्या विचारमंथनातून पुढील आंदोलनाची रणनीती आखण्यात येणार असून, राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

“जय विजुक्टा, संघटित संघटना” असा संदेश देत शिक्षकांनी मोठ्या संख्येने सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

सुटीत आजोळी आलेल्या तरुणाने केला मामाच्या दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; केज तालुक्यात महिला अत्याचाराची आठवड्यातील तिसरी घटना

Next Post

प्राचार्यपदी प्रवीण बुराण यांची निवड; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
13
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
6
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
17
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
11
Next Post

प्राचार्यपदी प्रवीण बुराण यांची निवड; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In