बाळापूर, जि. अकोला : प्रतिनिधी
गट ग्रामपंचायत जोगलखेड अंतर्गत सोनगिरी गावातील रस्ता गेल्या आठ वर्षांपासून दुरुस्तीअभावी खराब असून ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर व नाल्यात पाणी साचल्याने वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वीही या मार्गावर अपघात झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित ग्रामसेवक व प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





