• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्य कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लागू; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
राज्य कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लागू; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

वर्धा : राज्यातील कर्मचाऱ्यांना कोणती निवृत्तीवेतन योजना लागू होणार, याबाबत संदिग्ध स्थिती होती. नुकत्याच झालेल्या राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनाच्या संपात याविषयी मागणी रेटण्यात आली होती.तसेच जुनी निवृत्ती वेतन योजना लागू होणार नाही, हे सुद्धा शासनाने स्पष्ट केले होते. त्याचवेळी सुधारित योजनेबाबत लवकरच आदेश काढण्याची हमी दिली होती. अखेर बुधवारी त्यावर महाराष्ट्र शासनाने आदेश काढला आहे.

सुधारित योजना

RelatedPosts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लागू करण्याची सविस्तर कार्यपद्धती एका शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या निर्णयामुळे १ मार्च २०२४ पासून सेवेत असलेल्या आणि या योजनेचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निवृत्तीवेतनाचे स्वरूप असे

या योजनेनुसार, ज्या कर्मचाऱ्यांची सेवा २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे, त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या ५०% निवृत्तिवेतन आणि त्यावरील महागाई वाढ लागू होईल. १० ते २० वर्षांच्या दरम्यान सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तिवेतन दिले जाईल. या योजनेअंतर्गत किमान निवृत्तिवेतन ७,५०० रुपये निश्चित करण्यात आले असून, १० वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्यांना हे निवृत्तिवेतन लागू होणार नाही.विकल्प निवडण्याची मुदत

पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांनी या सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी आपला पर्याय ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत संबंधित कार्यालय किंवा विभाग प्रमुखांकडे सादर करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी NPS मधून काही रक्कम काढली असेल, त्यांना ती रक्कम १०% व्याजासह परत करावी लागेल. अन्यथा त्यांच्या निवृत्तिवेतनात त्याच प्रमाणात कपात केली जाईल.

निधी जमा करण्याची प्रक्रिया निश्चित आहे

योजनेच्या अंमलबजावणीसाठी खालील तांत्रिक बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ६०% परतावा जमा करणे. निवृत्तीच्या वेळी PFRDA कडून मिळणाऱ्या संचित निधीतील ६०% रक्कम कर्मचाऱ्यांनी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे (DDO) जमा करणे अनिवार्य आहे.

वार्षिकी

उर्वरित ४०% निधीवर मिळणाऱ्या वार्षिकीचा तपशील सादर करावा लागेल. शासन देय निवृत्तिवेतनातून ही वार्षिकीची रक्कम वजा करून अंतिम निवृत्तिवेतन निश्चित करेल.कुटुंब निवृत्तिवेतन: संबंधित कर्मचाऱ्याच्या निवृत्तिवेतनाच्या ६०% रक्कम कुटुंब निवृत्तिवेतन म्हणून देय असेल.व्याप्ती आणि अन्य लाभ मिळणार.ही योजना केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून, जिल्हा परिषद कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी आणि बिगर-कृषी विद्यापीठांमधील NPS धारक कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली आहे. तसेच, या कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदान (Gratuity) देखील लागू राहील. मात्र, राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही; त्यांना केवळ मूळ NPS चे लाभ मिळतील.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासकीय स्तरावर याची अंमलबजावणी आता युद्धपातळीवर सुरू होणार आहे.

Previous Post

शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा : ओमराजे बोत्रे पाटील

Next Post

बालगंगा प्रकल्प पुनर्वसनासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना वेग

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
2
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
2
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
Next Post
बालगंगा प्रकल्प पुनर्वसनासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना वेग

बालगंगा प्रकल्प पुनर्वसनासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना वेग

ताज्या बातम्या

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In