• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवड उपबाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल ४ हजारांचा दर; गव्हालाही चांगला भाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून, बुधवार दि. ६ रोजी ज्वारीला प्रतिक्विंटल कमाल ४ हजार रुपये तर गव्हाला प्रतिक्विंटल ३ हजार २०० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

सासवड उपबाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे, वाल्हे, राजुरी यांसह पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर व भोर तालुक्यातील शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा आदी धान्य विक्रीसाठी आणतात.

बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नंबर प्रतीच्या ज्वारीला प्रतिक्विंटल कमाल ४,००० रुपये, किमान ३,००० रुपये तर सरासरी ३,५०० रुपये दर मिळाला. गव्हाला कमाल ३,२०० रुपये, किमान २,६०० रुपये तर सरासरी २,९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

यावेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे तसेच व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन व शैलेश विरकर उपस्थित होते.

दरम्यान, निरा बाजारात गुळाचीही ५५० बॉक्स म्हणजेच ११० क्विंटल इतकी आवक झाली होती. गुळाला प्रतिक्विंटल किमान ४,१०० रुपये, कमाल ४,६०० रुपये तर सरासरी ४,२५० रुपये दर मिळाल्याची माहिती सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे आणि प्रवीण कर्णवर यांनी दिली. यावेळी गुळ व्यापारी शांतीकुमार कोठडिया उपस्थित होते.

उपबाजारातील प्रमुख धान्य दर (प्रतिक्विंटल):

  • ज्वारी : किमान ३,००० | कमाल ४,००० | सरासरी ३,५००
  • बाजरी : किमान २,५०० | कमाल ३,३०० | सरासरी २,९००
  • गहू : किमान २,६०० | कमाल ३,२०० | सरासरी २,९००
  • हरभरा : किमान ४,५०० | कमाल ५,७०० | सरासरी ५,१००
Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

थायलंडमध्ये बहाळच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; कल्पेश महाले यांनी पटकावले सुवर्णपदक

Next Post

वादळी पावसाने घानवळ गावातील कुटुंबावर संकट; घरावरील पत्रे उडाली, मोठे नुकसान

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
17
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post

वादळी पावसाने घानवळ गावातील कुटुंबावर संकट; घरावरील पत्रे उडाली, मोठे नुकसान

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In