• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली जंक्शनच्या विस्तारात अडथळा ठरलेल्या अतिक्रमणांवर बुलडोझर; संयुक्त कारवाईत परिसर अतिक्रमणमुक्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोली जंक्शनच्या विस्तारात अडथळा ठरलेल्या अतिक्रमणांवर बुलडोझर; संयुक्त कारवाईत परिसर अतिक्रमणमुक्त
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पनवेल : कळंबोली जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि सिडको महामंडळ प्रशासनाने मंगळवारी संयुक्त कारवाई करत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयासमोरील अतिक्रमणे हटवली. या कारवाईत वर्षानुवर्षे उभारण्यात आलेली पक्की व कच्ची बांधकामे जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी एमजीएम रुग्णालयासमोरील सेवा मार्गिका (कॉरिडॉर) मोकळी करणे आवश्यक होते. मात्र कामोठे येथील सेक्टर क्रमांक १ मधील सेवामार्गिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या सहा अनधिकृत बांधकामांमुळे प्रकल्पात अडथळा निर्माण झाला होता.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे मुख्य नियंत्रक विशाल ढगे आणि पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित बांधकामांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. त्यानुसार कामोठे येथील भूखंड क्रमांक एनए-६, सेक्टर-१ मधील सुमारे एक हजार चौरस मीटर क्षेत्रावरील एक पक्के बांधकाम तसेच सहा पत्राशेड स्वरूपातील कच्ची बांधकामे हटविण्यात आली. तसेच सेक्टर-६ए मधील भूखंड क्रमांक ३४ वर सुरू असलेले अनधिकृत पक्के बांधकामही तात्काळ पाडण्यात आले.

या कारवाईवेळी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने, अधीक्षक दशरथ भंडारी, उमेश मडवी, सिडकोचे मुख्य बांधकाम नियंत्रक विशाल ढगे, नियंत्रक श्रीकांत पावसकर, रावसाहेब देवकर यांच्यासह पनवेल महापालिका, सिडकोचे कर्मचारी, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कारवाईमुळे कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाला गती मिळणार असून वाहतूक कोंडीपासून प्रवाशांची मोठी सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

ग्रुप ग्रामपंचायतीस दिलेल्या पाण्याच्या टाकीच्या जागेची विक्री; स्थानिकांवर पायवाट बंदीचे संकट

Next Post

स्व. जनार्दन भगत साहेब यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त उलवे येथे कार्यक्रम संपन्न

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
स्व. जनार्दन भगत साहेब यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त उलवे येथे कार्यक्रम संपन्न

स्व. जनार्दन भगत साहेब यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त उलवे येथे कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In