• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रुप ग्रामपंचायतीस दिलेल्या पाण्याच्या टाकीच्या जागेची विक्री; स्थानिकांवर पायवाट बंदीचे संकट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्रुप ग्रामपंचायतीस दिलेल्या पाण्याच्या टाकीच्या जागेची विक्री; स्थानिकांवर पायवाट बंदीचे संकट
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी
पाताळगंगा (खोपोली) : ७ मे

ग्रुप ग्रामपंचायत वडगाव गावातील ग्रामपंचायतीस पाणीपुरवठ्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या जागेची परस्पर विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी सध्या घराचे बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव येथील संबंधित जागेवर सुमारे १५ वर्षांपासून पाण्याची टाकी उभी होती. टाकीच्या देखभालीसाठी मूळ मालकाच्या मुलाला कामावर ठेवण्यात आले होते. मात्र कालांतराने ही टाकी जीर्ण झाल्याने ती पाडण्यात आली व काही दिवसांपूर्वी त्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले. याचाच फायदा घेत मूळ मालकाने सदर जागेची परस्पर विक्री केल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, या जागेवरून स्थानिकांची पायवाट जात असल्याने सुरू असलेल्या बांधकामामुळे ये-जा करण्याच्या मार्गावर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका काय आहे तसेच जागेची विक्री कायदेशीर आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार नथुराम गडगे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

—————— चौकट ——————

“सदर जागा ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांना पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी देण्यात आली होती. त्याच्या मोबदल्यात संबंधितांच्या मुलाला कामावर ठेवण्यात आले होते. मात्र टाकी जीर्ण झाल्यानंतर ती पाडण्यात आली आणि रिक्त झालेली जागा हरिभाऊ श्यामा पाटील यांनी परस्पर विक्री करून आमच्या पायवाटीचा प्रश्न निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.”

— नथुराम गडगे, ग्रामस्थ वडगाव

—————— चौकट ——————

“सदर जागेच्या ठिकाणी घराचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांच्या माध्यमातून हरिभाऊ पाटील गडगे यांना आठ दिवसांच्या आत बांधकाम हटवून जागा मोकळी करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.”

— सुहास वारे, ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव

Tags: Kashinath Jadhav
Previous Post

आज दहावीचा निकाल जाहीर होणार; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल

Next Post

कळंबोली जंक्शनच्या विस्तारात अडथळा ठरलेल्या अतिक्रमणांवर बुलडोझर; संयुक्त कारवाईत परिसर अतिक्रमणमुक्त

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
8
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
कळंबोली जंक्शनच्या विस्तारात अडथळा ठरलेल्या अतिक्रमणांवर बुलडोझर; संयुक्त कारवाईत परिसर अतिक्रमणमुक्त

कळंबोली जंक्शनच्या विस्तारात अडथळा ठरलेल्या अतिक्रमणांवर बुलडोझर; संयुक्त कारवाईत परिसर अतिक्रमणमुक्त

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In