खोकरमोहा : प्रतिनिधी
पीएम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, खोकरमोहा यांनी शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत उज्वल परंपरा कायम राखली आहे. शाळेचा एकूण निकाल ९७.३६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
या परीक्षेसाठी एकूण ७६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ४४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे, तर ४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. कला व क्रीडा क्षेत्रात अतिरिक्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ आहे.


यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये टाकसाळ सायली नारायण हिने ९४.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. उगलमुगले समीक्षा राजेंद्र आणि घुगे सार्थक शंकर यांनी प्रत्येकी ९३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. शेख राहत हमीद याने ९१.८० टक्के तर क्षीरसागर ऋतुजा ज्ञानेश्वर हिने ९०.०४ टक्के गुण मिळवत अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुख्याध्यापक श्री. वाघुंबरे सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवर्गाने घेतलेल्या परिश्रमांचे हे फलित मानले जात आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिमराव मिसाळ तसेच मुळे सर, कानडे सर, काळे सर, बनकर मॅडम, पवार सर, खेडकर मॅडम, विक्रम मिशा सर, सोमिनाथ मिसाळ sir, सोनवणे सर, गर्कळ मॅडम, सानप सर, पठाण मॅडम व मिसाळ मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










