सारथी महाराष्ट्राचा.
मोईन शेख (ता.प्र)
किनवट- बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे ‘विरासत ए बंजारा’ संग्रहालय उभारले जात आहे. त्यांचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या 05 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचे अनावरण केले जाणार आहे.
पोहरादेवी येथे नंगारा प्रतिकृती वास्तु संग्रहालयाचे निर्माण कार्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,राष्ट्रसंत रामराव महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा 3 डिसेंबर 2018 रोजी सुरू झाले. 6 वर्षानंतर हे काम आता अंतिम टप्प्यात आले. असून दि.05 ऑक्टोबर 2024 रोजी भारत देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच साधुसंत महंत व मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले. या सोहळ्याला बंजारा समाज बांधव व महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केले आहे.
Discussion about this post