• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लाल बहादूर शास्त्री विद्यालय, बेळंबचा दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान निकाल; १०० टक्के यशाची परंपरा कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
लाल बहादूर शास्त्री विद्यालय, बेळंबचा दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान निकाल; १०० टक्के यशाची परंपरा कायम
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

उमरगा प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उमरगा तालुक्यातील बेळंब येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल तब्बल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्तेचा नवा इतिहास घडविला आहे.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. चेतना सहदेव बोडरे हिने ८८.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. श्रुती सागर सूर्यवंशी हिने ८६.६० टक्के गुणांसह द्वितीय तर शिवदेव कल्लेश्वर येलगुंदे याने ८५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यंदाच्या परीक्षेत ४० पैकी २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले असून १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यालयातील तब्बल १२ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा, संस्था, शिक्षक तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत घंटे, उपाध्यक्ष दीपक जमादार, सचिव राजेंद्र जमादार, कोषाध्यक्ष जगदीश जमादार तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्याध्यापक श्री. शंकर आसबे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गावातील नागरिकांनीही विद्यालयाच्या यशाचे कौतुक करत शिक्षकांच्या मेहनतीचा गौरव केला.

गावकऱ्यांनी सांगितले की, “आसबे सर, कळपे सर, गायकवाड सर, पाटील सर तसेच एस. एन. कांबळे मुरूमकर सर यांनी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी अधिकारी, पोलीस, पत्रकार अशा विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत.”

कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

श्रीमती जीटीपी कन्या हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन

Next Post

मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत डंका; शाळेचा निकाल ९६ टक्के!

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
61
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
159
Next Post

मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत डंका; शाळेचा निकाल ९६ टक्के!

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In