• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मध्ये ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’मध्ये ८ नक्षल्यांना अटक, ५ जणांचे आत्मसमर्पण
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

६५ लाखांची रोकड आणि मोठा शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली : प्रतिनिधी

नक्षल चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ८ नक्षल्यांना अटक करण्यात आली असून ३८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ५ जहाल नक्षल्यांनी शनिवारी (दि. १६) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या कारवाईनंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांमध्ये कंपनी क्रमांक १० चा विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी व कंपनी सदस्य जन्नी उर्फ नगी येमला, तसेच जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी, ज्योती पोटावी आणि आमती पोडियाम यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

पोलिसांनी या कारवाईत नक्षल्यांकडून ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड जप्त केली असून एके-४७, एसएलआरसह इतर बंदुकांचा मोठा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भामरागड तालुक्यातील फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले होते. त्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही नक्षल्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील चार नक्षल्यांना तेलंगणातून, तर उर्वरित आरोपींना कुमनार आणि नैताळा परिसरातून अटक करण्यात आली.

५ जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण

पोलिस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये मधु उर्फ राकेश वेळदा, जीवन उर्फ जग्गू मडकाम, रजनी उर्फ दुर्गा धुर्वा, मंगली कुरसाम आणि लक्ष्मी पुनेम यांचा समावेश आहे. या नक्षल्यांमध्ये विभागीय समिती सदस्य, प्लाटून समिती सदस्य, क्षेत्रीय समिती सदस्य आणि दलम सदस्यांचा समावेश असून शासनाने त्यांच्यावर एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

“सशस्त्र संघर्ष संपला, पण विचारधारेवर लक्ष ठेवणार”

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाविरोधातील सशस्त्र संघर्ष आता संपुष्टात आल्याचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले. मात्र, नक्षलवादी विचारधारा पूर्णपणे संपली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे इतर राज्यांतून नक्षलवादी गडचिरोलीत प्रवेश करू नयेत यासाठी पोलिसांकडून सतत सतर्कता ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

यशोगाथा : रिक्षाचालक बाबा पठाण यांनी मुलीचा विवाह उत्साहात पार पाडला

Next Post

जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भव्य भूमिपूजन उत्साहात संपन्न

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
7
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
7
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
27
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
4
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
2
Next Post
जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भव्य भूमिपूजन उत्साहात संपन्न

जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भव्य भूमिपूजन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In